मुंबई : आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात शाहरुख खानची मालकी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनेही अनेक युवा क्रिकेटर्सना संघात संधी दिलीये. यातीलच एक नाव म्हणजे अपूर्व वानखडे.


२०१२मध्ये वानखेडेच्या मैदानावर एक किस्सा घडला होता जो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आठवत असेल. या मैदानावर किंग खानने तेथील अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी वानखेडे स्टेडियमवर येण्यासाठी शाहरुखवर ५ वर्षांची बंदी घातली होती. 


शाहरुख खान बॉलीवूडच्या जगतातील किंग असला तरी तो एक बिझनेस मास्टरमाईंड आहे. पाच वर्षांपूर्वी याच वानखेडेवरुन शाहरुख चर्चेत आला होता. त्यानंतर आता पाच वर्षानंतर तो पुन्हा याच नावाने चर्चेत आलाय.


आम्ही बोलत आहोत अपूर्व वानखडे या क्रिकेटरबद्दल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अपूर्वला केकेआरने संघात विकत घेतलेय. त्याला २० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर शाहरुखने संघात घेतलेय.


स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये अपूर्वची कामगिरी चांगली राहिलीये. १० सामन्यांमध्ये त्याने ३३० धावा केल्यात. यात १०७ धावांची खेळी महत्त्वपूर्ण राहिलीये. याआधी तो मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्या वानखेडेवर शाहरुखला येण्यास बंदी घालण्यात आली होती त्याच नावाशी साधर्म्य असणाऱ्या क्रिकेटरलाच शाहरुख खानने विकत घेतलेय. त्यामुळे वानखेडे आणि शाहरुख ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.