बंगळुरू : टी-२० चा बादशाह, धुरंधर बॅटसमन आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू ख्रिस गेलला यंदा 'खरेदीदार'च मिळालेला नाही... त्यामुळे त्याचा लिलाव होऊ शकलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या एकाही टीमनं गेलला खरेदी करण्यासाठी इच्छा व्यक्त केली नाही.


खराब परफॉर्मन्स...


यापूर्वीच्या आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये गेल केवळ एकाच मॅचमध्ये चांगला खेळू शकला होता. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला. 


आयपीएलचा बादशाह


ख्रिस आयपीएलच्या दहाव्या सीझनमध्ये ९ मॅचमध्ये केवळ २०० रन्स करू शकला होता. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १२२ होता. गेलच्या संपूर्ण आयपीएल करिअरचा विचार केला तर त्यानं १०१ मॅचमध्ये ३६२६ रन्स ठोकलेत. 


क्रीडा चाहत्यांची मागितली होती माफी


गेल्या वर्षी आयपीएल संपता-संपता ख्रिस गेलनं क्रीडा चाहत्यांची माफिही मागितली होती. 'माझ्यासाठी हे खूपच निराशाजनक होतं. मी माझ्या स्वत:च्या आणि टीमच्या प्रदर्शनावर अजिबात खूश नाही' असं ख्रिसनं म्हटलं होतं.