मुंबई : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात मुंबईच्या टीमनी ६ खेळाडूंना विकत घेतलं. मुंबईने नॅथन कुल्टर नाईलसाठी ८ कोटी रुपये, क्रिस लीनसाठी २ कोटी रुपये, सौरभ तिवारीसाठी ५० लाख, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय यांच्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मोजले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा लिलाव सुरु झाला तेव्हा पहिलंच नाव क्रिस लिनचं पुकारलं गेलं. लिनसारख्या आक्रमक खेळाडूवर मोठी बोली लागेल, असा अंदाज होता. पण मुंबईने त्याला बेस प्राईजलाच विकत घेतलं.




मुंबईच्या टीममध्ये दाखल झाल्यानंतर क्रिस लिनने लगेचच आपण उत्साही असल्याचं सांगितलं. तसंच आता बुमराहविरुद्ध खेळावं लागणार नाही, याबाबत लीनने आनंद व्यक्त केला. मुंबईच्या टीमने विकत घेतल्यानंतर क्रिस लिनने लगेचच हे ट्विट केलं. क्रिस लिनच्या या ट्विटला जसप्रीत बुमराहनेही प्रतिक्रिया दिली. मुंबईच्या टीममध्ये स्वागत, पण तुला माझ्याविरुद्ध नेटमध्ये खेळावंच लागेल, असा इशारा बुमराहने लिनला दिला.