IPL Auction 2021: ख्रिस मॉरिसने मोडला युवराज सिंहचा रेकॉर्ड
IPL Auction 2021: IPLच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूनं मोडला युवराज सिंहचा रेकॉर्ड
चेन्नई: आयपीएलसाठी चेन्नईमध्ये आज खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. आयपीएलच्या आठ फ्रँचायझी 61 जागा भरण्यासाठी बोली लावत आहेत. यामध्ये 164 भारतीय, 124 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावादरम्यान IPLच्या इतिहासातील सर्वात महागडी बोली लावण्यात आली. ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. इतकच नाही तर क्रिस मॉरिसनं युवराज सिंहचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. त्यामुळे आता ख्रिस मॉरिसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
युवराज सिंह सर्वात महागडा खेळाडू होता. ऑलराऊंडर युवराज सिंहवर 2015 मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावादरम्यान सर्वात महागडा खेळाडू म्हणून मान मिळवला होता. त्यावेळी युवराजवर 16 कोटींची बोली लावण्यात आली होती. युवराजने त्या मोसमात काही खास केले नाही. त्याला 14 सामन्यात केवळ 248 धावा करता आल्या.
ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं सर्वाधिक किंमत देऊन संघात सामिल करून घेतलं आहे. 16.25 कोटी रुपये देऊन ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सनं संघात समाविष्ट करून घेतलं. IPLच्या इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
16.25 कोटी - ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स - 2021)
16 कोटी - युवराज सिंह (दिल्ली डेयरडेविल्स - 2015)
15.5 कोटी - पॅट कमिन्स (कोलकाता नाइट राइडर्स - 2020)
14.5 कोटी - बेन स्टोक्स (राइजिंग पुणे सुपरजाऐंट्स - 2017)
14.25 कोटी - ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर - 2021)
14 कोटी - युवराज सिंह (रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु - 2014)
14 कोटी - झाए रिचर्डसन (पंजाब किंग्स - 2021)
12.5 कोटी - दिनेश कार्तिक (दिल्ली डेअरडेविल्स - 2014)
12.5 कोटी - बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स - 2018)