चेन्नई: यंदाच्या आयपीएल हंगामासाठीचा लिलाव चेन्नईमध्ये सुरू आहे. या लिलावात ख्रिस मॉरिसनं इतिहास रचला आहे. त्यानंतर आणखीन एक खेळाडू आता विराट कोहलीच्या संघात समाविष्ट झाला आहे. RCB संघानं या खेळाडूवर खास 15 हजाराची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) गुरुवारी चेन्नईत जाहीर झालेल्या लिलावात न्यूझीलंडचा 6 फूट 8 इंचाचा वेगवान गोलंदाज काइल जेम्सनला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या मोसमात 15 कोटी रुपये देऊन RCBनं आपल्या संघात घेतला. ख्रिसनंतर दुसऱ्या स्थानावर लिलावात या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. 


वेगवान गोलंदाज काइल जेम्सन यंदाच्या मौसमात दुसऱ्या क्रमांकावरचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याची बेस किंमत केवळ 75 लाख रुपये होती. मात्र त्याच्यावर 15 कोटींची बोली लावत विराट कोहलीच्या RCBने आपल्या संघात समाविष्ट केलं आहे.



काइल जेम्सनची कामगिरी काइल जेम्सनने मागील वर्षी 2020 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केले होते आणि वेगवान गोलंदाजने वन डे, टी -20 आणि कसोटी तीन स्वरूपात पदार्पण केले होते. जेम्सनने टी-20 कसोटीत 36 विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने 56 ओव्हर च्या सरासरीने 226 धावाही केल्या आहेत. जेम्सनने आतापर्यंत 38 टी -20 सामन्यांमध्ये एकूण 54 बळी घेतले आहेत. टी -20 मध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 27.14 आहे. जेम्सनचा स्ट्राइक रेटही 138 पेक्षा जास्त आहे.