महागड्या विदेशी युवा गोलंदाजावर 14 कोटींची बोली, पहिल्यांदाच खेळणार IPL
अवघ्या 24 वर्षांचा हा युवा विदेशी गोलंदाज कोण आहे जाणून घ्या.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीगसाठी लिलाव सुरू झाला आहे. चेन्नईमध्ये दुपारी 3 वाजल्यापासून हा लिलाव सुरू आहे. यंदाच्या मौसमात एका विदेशी युवा गोलंदाज खेळाडूवर 14 कोटींची बोली लागली आहे. हा खेळाडू पहिल्यांदाच IPLच्या मैदानात उतरणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू झाए रिचर्डसन 14 कोटींच्या बोलीसह पंजाब किंग्स संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. त्याची बेस किंमत 1.50 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स या दोघांमध्ये झाए रिचर्डसनवरून जुंपली असतानाच पंजाबने संधी साधली. पंजाब किंग्सने 14 कोटींची बोली लावत संघात समाविष्ट करून घेतलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू गोलंदाज झाए रिचर्डसन निव्वळ 24 वर्षांचा आहे. त्याने आजवर एकदाही IPLमध्ये भाग घेतलेला नाही. ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा हा युवा वेगवान गोलंदाज बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्सकडून खेळतो. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये रिचर्डसन सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. लीगच्या 17 सामन्यात त्याने 29 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा हा सर्वात युवा गोलंदाज आहे. त्याने वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय करियरची सुरुवात केली. आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय टेस्ट सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. तर 45 धावा संघाला मिळवून दिल्या. त्याने आतापर्यंत 13 वन डे सामन्यात 92 धावा आणि 24 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी-20 सामन्यातील 9 सामन्यात 9 विकेट्स स्वत:च्या नावावर केल्या आहेत.
ख्रिस मॉरिसवर राजस्थान रॉयर्लने सर्वात महागडी बोली लावली आहे. 16.25 कोटींच्या किंमतीसह राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाला आहे. त्याने युवराज सिंहचा 2015मधला 16 कोटींचा रेकॉर्डही तोडला आहे.