IPL Auction 2024 : आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंचा `भाव` वाढला, कोणत्या संघाचा कोणावर डोळा? पाहा पूर्ण लिस्ट
Two Crore Base Price Full list : आयपीएलने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत (Base price for IPL Auction) 2 कोटी रुपये आहे. यामध्ये कोणकोणते खेळाडू आणि कोणत्या संघाचे खेळाडू आहेत? पाहुया...
Base price for IPL Auction : आयपीएलच्या 17 व्या हंगामाच्या लिलावासाठी (IPL 2024 Auction) दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. हा लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने लिलावासाठी आता फायनल यादी (IPL 2024 Auction Player list) जाहीर केल्यानंतर आता आपली संघांच्या बैठकीला वेग आलाय. कोणत्या खेळाडूला संघात घ्यायचं? यासाठी आता बैठकीचा तडाखा लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता येत्या 19 डिसेंबरला 333 खेळाडूंचं भवितव्य कैद होणार आहे. आयपीएलने जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. यामध्ये कोणकोणते खेळाडू आणि कोणत्या संघाचे खेळाडू आहेत? पाहुया...
कोणत्या खेळाडूंची दोन कोटीची बेस प्राईज?
टीम इंडिया : हर्षल पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव.
इंग्लंड : हॅरी ब्रूक, टॉम बँटन, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट.
दक्षिण आफ्रिका: गेराल्ड कोएत्झी, रिले रुसो, रॅसी व्हॅन डर ड्युसेन.
न्यूझीलंड : लॉकी फर्ग्युसन.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज.
बांगलादेश : मुस्तफिजुर रहमान.
अफगाणिस्तान : मुजीब उर रहमान.
दरम्यान, आयपीएलच्या पुढील लिलावासाठी एकूण 173 खेळाडूंना 10 फ्रँचायझींनी कायम ठेवले. यातील 50 खेळाडू परदेशी आहेत. या कायम ठेवलेल्या खेळाडूंवर एकूण 737.05 कोटी रुपये खर्च झालाय. लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत. 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही यात समावेश आहे.
कोणाकडे किती रक्कम बाकी?
चेन्नई सुपर किंग्ज : 31.40 कोटी
दिल्ली कॅपिटल्स : 28.95 कोटी
गुजरात टायटन्स : 23.15 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स : 32.70 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स : 13.15 कोटी
मुंबई इंडियन्स : 15.25 कोटी
पंजाब किंग्ज : 29.10 कोटी
राजस्थान रॉयल्स : 14.50 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : 23.25 कोटी
सनरायझर्स हैदराबाद : 34.00 कोटी.