चेन्नई : आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिष पांडेला 11 कोटी रुपये खर्च करुन किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं. सनरायझर्स हैदराबादनंही लोकेश राहुलला खरेदी करण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च केले. तर भारताच्या यंगिस्तानच्या टीमचा कर्णधार पृथ्वी शॉला दिल्ली डेअर डेव्हिलिल्सनं 1.2 कोटी रुपये खर्च करुन खरेदी केलं. 


तर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल आणि श्रीलंकेच्या लसिथ मलिंगासाठी कुठल्याही संघानं बोली लावली नाही. तर युवराज सिंगला केवळी 2 कोटी रुपयांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं खरेदी केलं.