IPL 2024 Mumbai Indians Players List: दुबईमध्ये सुरू असलेल्या लिलावात (IPL 2024 Auction) मुंबई इंडियन्सने घाई न करता दोन तगड्या खेळाडूंना संघात सामील करून घेतलं आहे. मुंबईने माईंड गेम खेळत दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) आणि जेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) यांना संघात सामील करून घेतलं. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे बुमराहसोबत दोन तगडे गोलंदाज असणार आहेत. त्याचबरोबर कॅप्टन पांड्याची (Hardik Pandya) साथ देखील या दोघांना लाभणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका संघाच्या जेराल्ड कोएत्झी याला मुंबई इंडियन्सने 5 कोटी रूपयांना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लिलावामध्ये खरेदी केलेला तो पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर मुंबईने अनेक खेळाडूंसाठी प्रयत्न केला. मात्र, मुंबईने मोठ्या लिलावातून काढता पाय घेतला. त्यानंतर मुंबईने दिलशान मदुशंका याला सामील करून घेण्यासाठी बोली लगावली अन् 4.60 कोटींच्या बदल्यात त्याला संघात घेतलं आहे.


रोहित शर्माला नारळ देऊन मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्या याला कर्णधार बनवलं, तेव्हापासून अनेक चाहते मुंबई इंडियन्स संघाची जर्सी पेटवत दिसले. तर काहींनी मुंबईच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शिवागाळ केल्याचं देखील दिसतंय. अशातच आता मुंबईच्या ऑक्शनच्या निर्णयावर फॅन्स उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहे. 



मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)


हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेविड, विष्णु विनोद, अर्जुन तेंदुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ, हार्दिक पंड्या आणि रोमारियो शेफर्ड.


जेराल्ड कोइटजी (Gerald Coetzee) - 5 करोड (बेस प्राइस 2 करोड)


दिलशान मधुशंका (Dilshan Madushanka) - 4.60 करोड (बेस प्राइस 50 लाख)