क्रिकेटने दिली साथ गरिबीशी केले दोन हात; कहाणी मजूर बापाच्या क्रिकेटपटू मुलाची
भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपिएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
नवी दिल्ली : भ्रष्टाचार, ग्लॅमर, प्रसिद्धी आणि फिक्सिंग अशा गोष्टींमुळे आज आयपीएल बदनाम आहे. तरीसुद्धा, देशभरातील अनेक क्रिकेटपटूंचे नशिब घडविण्यात आणि बदलवण्यातसुद्धा आयपीएल कारणीभूत ठरले हे आपणास नाकारता येणार नाही. नाथू सिंह या आयपीएल खेळाडूच्या उदाहरणातून हे ठळकपणे पुढे येऊ शकते.
एकेकाळी गरिबीमुळे अत्यंत हालाकीचे जीवन जणाऱ्या आणि स्वत:चे घर विकायला काढलेल्या मजूर वडिलांसाठी नाथू आता कोट्यवधी रूपयांचे घर बांधतोय. नाथू सिंहला क्रिकेटचे भारी वेड. लहानपनापासून क्रिकेट हे त्याचे जीव की प्राण. मुलाची ही आवड पाहून भलेही घरात गरीबी असली तरी, त्याच्या वडीलांनी त्याला पाठिंबाच दिला. खेळता खेळता एक दिवस नाथूची निवड आयपीएलच्या संघात झाली आणि त्याचे नशीबच पालटले. नाथूचे वडील एका वायर कंपनीत मजूरी करतात. त्यांच्या कमाईतूनच घरगाडा चालत असे. त्यामुळे आर्थिक तंगी रोजचीच असायची. पण, ही तंगी त्यांनी आपल्या मुलाच्या आवडीच्या आड कधीच येऊ दिली नाही.
आपली आठवण सांगताना नाथू सांगतो की, आयपीएलमध्ये संधी मिळूनही गरीबी हटली नव्हती. एकदा त्याला खेळातील बुटांची फार गरज होती. ज्याची किंमत त्या काळात प्रचंड होती. पण, मुलाच्या भवितव्यासाठी त्याच्या वडीलांनी घर विकायचे ठरवले. ऐनवेळी निर्णय बदलत व्याजाने पैसे काढले आणि बुट खरेदी केले. दरम्यान, नाथूचे नशिब बदलले. तो आयपीएलमध्ये चांगलाच चमकला. त्यामुळे त्याच्याकडे येणाऱ्या पैशाचा चांगलाच वाढला.
आयपीएलमध्ये १० लाख रूपये मानधनावर खेळणाऱ्या नाथूला मुंबई इंडियन्सने ३.२ कोटी रूपयांना खरेदी केले. त्याचे नशीब पालटले. आज तो कोट्यवधी रूपयांचे घर बांधत आहे. एकेकाळी गरिबीमुळे घर विकण्याची वेळ आलेले नाथूचे वडील कौतूक भरल्या डोळ्यांनी मुलाबद्धल भरभरून बोलतात. मागच्या वेळच्या सीजनमध्ये नाथूला आयपीएलमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. पण, या वेळी त्याला गुजरात लायन्सने ५० लाख रूपयांना खरेदी केले.
आयपीएलमुळे एका रात्रीत नशिब बदललेला नाथू, आपल्या आई-वडीलांसाठी जयपूरमध्ये दीड कोटी रूपयांचे घर बांधतो आहे. तीन मजली असलेले हे आलीशान घर परिसरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहे.