यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील रंगतदार झालेल्या एलिमिनेटर सामन्यात (IPL Eliminator 2021) कोलकाताने (KKR) बंगळुरुवर (RCB) 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह कोलकाताने फायनलच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं. तर बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं. टीमचा पराभव झाला असला, तरी वेगवान गोलंदाज हर्षल पटेलसाठी हा मोसम आयुष्यभर लक्षात राहिल. हर्षल पटेलने या एलिमिनेटर सामन्यात 2 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली. (IPL Eliminator 2021 kkr vs rcb faster bowler Harshal Patel equals Dwayne Bravos record of 32 wickets in a single season)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच हर्षल आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाजही ठरला.


ब्राव्होच्या विक्रमाची बरोबरी


हर्षल पटेलच्या नावे या एलिमिनेटर सामन्याआधी एकूण 30 विकेट्सची नोंद होती. हर्षलला ड्वेन ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 3 विकेट्सची आवश्यकता होती. मात्र हर्षल 2 विकेट्स घेण्यातच यशस्वी ठरला. हर्षलने वेंकटेश अय्यरला आऊट करत 32 वी विकेट पूर्ण केली. यासह हर्षलने ड्वेन ब्राव्होच्या सर्वाधिक विकेट्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली.


आता हर्षलला हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 1 विकेटची गरज होती. हर्षलला तिसरी विकेट जवळपास मिळाली होती. पण देवदत्त पडीक्कलच्या एका चुकीमुळे ती विकेट मिळू शकली नाही. त्यामुळे ड्वेन ब्राव्होचा अबाधित राहिला.


त्याचं झालं असं की, हर्षलच्या गोलंदाजीवर सुनील नारायणने फटका मारला. हा फटका देवदत्त पडीक्कलच्या दिशेने मारला. मात्र देवदत्तने हा कॅच सोडला. देवदत्तची एक चूक हर्षलला आणि पर्यायाने  कोलकाताला महागात पडली. त्यामुळे ब्राव्होचा रेकॉर्ड कायम राहिला. हर्षलने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. 


देवदत्तने सुनील नारायण 25 धावांवर असताना त्याचा कॅच सोडला. मात्र सुनील त्यानंतर 26 धावांवर आऊट झाला. सुनील फक्त 1 धाव करुन आऊट झाला. मात्र तोच कॅच देवदत्तने पकडला असता, तर कदाचित सामन्याचा निकाल आणखी काही लागू शकला असता.


ब्राव्होच्या आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स


आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हा ड्वेन ब्राव्होच्या नावे आहे. ब्राव्होने 2013 मध्ये चेन्नईकडून खेळताना 32 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तर कगिसो रबाडाने गत मोसमात म्हणजेच 13 व्या पर्वात दिल्लीकडून खेळताना 30 फलंदांजाची दांडी गुल केली होती.


सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज


हर्षल पटेलने ब्रोव्होच्या विक्रमाची बरोबरी करण्यासह एक विक्रम प्रस्थापित केला. हर्षलने एका मोसमात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराहला पछाडत किर्तीमान केला. यासह हर्षल अशी कामगिरी करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. याआधी आयपीएलच्या 13 व्या हंगामात जसप्रीत बुमराहने 27 विकेट्स घेतल्या होत्या. तर हर्षलने 32 विकेट्स घेतल्या आहेत.   


14 व्या हंगामात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज


हर्षल पटेलने या मोसमात मुंबई इंडियन्स विरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला. हर्षल या मोसमात हॅटिट्रिक घेणारा पहिला आणि बंगळुरुचा एकूण तिसरा गोलंदाज ठरला. हर्षलने या सामन्यात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. 


टीम इंडियाकडून संधी मिळणार?


आयपीएलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड यासारख्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनीही आयपीएलमधून त्यांच्यात असलेली गुणवत्ता दाखवून दिली.


हर्षल पटेलनेही आपली हुशारी आणि कामगिरी दाखवून दिली आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि निवड समिती येत्या काळात हर्षल पटेलला टीम इंडियाकडून संधी देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.