शारजा : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा पराभव झाला. यासह बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर 4 विकेट्सने मात केली. बंगळुरुकडे या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. बंगळुरुने साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. (ipl eliminator 2021 kkr vs rcb virat unique coincidents captain kohli startd and ends with 39 runs score as a captain)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटसेनेला अशीच कामगिरी बाद फेरीत कायम ठेवता आली नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा अखेरचा साामना होता. विराटच्या कॅप्ट्न्सीच्या डावाचा शेवट हा पराभवाने झाला. 


विराटने 9 मोसमात बंगळुरुचं नेतृत्व केलं. डॅनियल व्हिटोरीनंतर विराटला कर्णधारपजदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र विराटला एकाही मोसमात बंगळुरुला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. 


विराटने एलिमिनेटरच्या सामन्यात 39 धावांची खेळी केली. या खेळीसह विराटसोबत एक विचित्र योगायोग जुळून आला.


काय आहे योगायोग?


विराटने कर्णधार म्हणून पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात योगायोगाने 39 धावांची खेळी केली. विराटला 2011 मध्ये हंगामी नेतृत्व देण्यात आलं होतं. 


यावेळेस त्याने कर्णधार म्हणून पदार्पण करताना 39 धावा कुटल्या होत्या. विराटला 2013 मध्ये कायमस्वरुपी कर्णधार करण्यात आलं.  


कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा


विराटने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा आणि शतकं बनवल्या आहेत. विराटने कर्णधार म्हणून 41.99 च्या सरासरीने  4 हजार 871 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.


एकूण 140  सामन्यात नेतृत्व 


विराटने एकूण 140 सामन्यात बंगळुरुचं नेतृत्व केलं. यापैकी 66 साम्न्यात बंगळुरुचा विजय झाला. तर 70 मॅचेसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. विराटने आपल्या नेतृत्वात बंगळुरुला 2015, 2020 आणि या यंदाच्या मोसमात  प्लेऑफपर्यंत पोहचवलं. 


बंगळुरुने 2016 मध्ये तर धमाकाच केला. बंगळुरुने 2016मध्ये अंतिम फेरीत धडक मारली. मात्र ट्रॉफीपासून वंचित राहिले. त्यामुळे 2016 मध्ये बंगळुरु तिसऱ्यांदा उपविजेता ठरला. 


विराटचा धमाका


विराटसाठी आयपीएलच्या इतिहासातील 2016 वर्ष हे अविस्मरणीय ठरलं. विराटने या वर्षातील आयपीएल मोसमात एकूण 4 शतकांसह 973 धावा केल्या. 


दरम्यान आता विराट या पुढील आयपीएल स्पर्धेत एका खेळाडूच्या रुपात खेळताना दिसणार आहे. मात्र विराटच्या नेतृत्वाच्या अनुभवाचा फायदा हा बंगळुरुच्या भावी कर्णधाराला आणि खेळाडूंना होईल, इतकं नक्कीच.