यूएई : अखेरच्या ओव्हपर्यंत गेलेल्या एलिमिनेटर (IPL Eliminator 2021) सामन्यात कोलकाताने बंगळुरुवर मात केली. या विजयासह कोलकाताने क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. तर आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं. कर्णधार म्हणून विराटचा हा आयपीएलमधील अखेरचा सामना होता. विराटच्या या कॅप्टन्सीच्या इनिंगचा शेवट हा पराभवाने झाला. विराट बंगळुरुचं 9 वर्ष नेतृत्व करत होता. (ipl eliminator 2021 rcb vs kkr former captain gautam gambhir critisize to rcb captain virat kohli)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र विराटला एकदाही बंगळुरुला ट्रॉफी जिंकून देता आली नाही. या मुद्द्यावरुन विराटवर अनेकदा आजी माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली होती. कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराटवर हल्लाबोल केला आहे. 


गंभीर काय म्हणाला?   


विराट हा रणनिती आखण्याबाबत सक्षम कर्णधार नसल्याचं गंभीर नमूद केलं. तो क्रिकइन्फोसोबत बोलत होता. यावेळस त्याने याबाबत विधान केलं.


"विराट उत्साही आणि क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमाबाबत सर्वश्रेष्ठ कर्णधार असू शकतो, यात काही शंका नाही. मात्र विराटमध्ये टॅक्टिक आणि सामना कोणच्या बाजूने जातोय, याबाबत विराट तितका सक्षम नाही, जितका तो असायला हवा. कारण, 9 वर्षांचा काळ हा मोठा असतो, तसेच जे काही करायचं आहे ते विराटलाच करायचं होतं. संघ उभा करण्यापासून ते सर्व निर्णय हे विराटलाच घ्यायचे होते. टी 20 क्रिकेटमध्ये तुम्हाला एक्शन प्लॅननुसार एक पाऊल पुढेच असायला हवं", असं गंभीरने नमूद केलं. 


एक ओव्हर निर्णायक


कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात झालेला सामना हा लो स्कोरिंग झाला. यावरुनही गंभीरने भाष्य केलं. "बघा, जेव्हा सामना हा लो स्कोरिंग असतो, तेव्हा तुम्हाला आघाडीवर राहायला हवं. डॅनियल ख्रिस्टियनने टाकलेली ओव्हर ही निर्णायक ठरली. त्याने एका ओव्हरमध्ये 22 धावा लुटवल्या", असं गंभीर म्हणाला. डॅनियलच्या या महागड्या ओव्हरमुळे सामना कोलकाताच्या बाजूने झुकला. ही गोष्ट विराटला ही मान्य आहे.   


सुनील मिस्ट्री नाही क्वालिटी स्पिनर 


या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताचा अष्टपैलू सुनील नारायणने बॉलिंगसह बॅटिंगने धमाका केला. त्याने आधी बॉलिंग करताना 4 फलंदाजांना आऊट केलं. तर बॅटिंग करताना त्याने निर्णायक क्षणी 25 धावांची छोटेखानी पण महत्त्वाच्या वेळेस खेळी केली.  


क्रिकेट विश्वात सुनीलला मिस्ट्री स्पिनर म्हणतात. पण मी त्याला क्वालिटी स्पिनर मानतो. जर मिस्ट्री असता, तर केव्हाच सोडवलं असतं. विराट, एबी डीव्हीलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल या त्रिकुटाला सुनीलने चांगल्या चेंडूवर आऊट केलं. या तिघांना आधाही सुनीलचा सामना करता येत नव्हता आणि आजही येत नाही, असं विराटने स्पष्ट केलं.