कोलकाता : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (25 मे) एलिमिनेटर सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स  (LSG) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये (Eden Garden) साडे सात वाजता सुरुवात होणार आहे. (ipl eliminator 2022 lsg vs rcb lucknow super giants vs royal challengers banglore who will win and go qualifier 2)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलिमिनेटेर सामना जिंकणारी टीम क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दोन हात करेल. क्वालिफायर 2 सामन्यात जिंकणारा संघ ट्रॉफीसाठी गुजरात टायटन्ससोबत भिडेल.


थोडक्यात सांगायचं झाल्यास एलिमिनेटर खेळणाऱ्या आरसीबी आणि लखनऊ या दोन्ही संघांना चॅम्पियन होण्यासाठी इथून सलग 3 सामने जिंकावे लागणार आहेत.


दरम्यान साखळी सामन्यात लखनऊ आणि आरसीबीचा 19 एप्रिलला सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला होता.


या सामन्यात आरसीबीचा कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने 96 धावांची झंझावाती खेळी केली होती. तर जोश हेझलवूडने लखनऊच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. आरसीबीने लखनऊ विरुद्धच्या सामन्यात बॅटिंग, फिल्डिंग आणि बॉलिंग अशा तिन्ही आघाड्यांवर धमाकेदार कामगिरी केली होती. 


तर लखनऊकडून सर्व फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र त्यांना या आकड्याचं मोठ्या संख्येत रुपांतर करता आलं नाही. लखनऊच्या फलंदाजांना आरसीबीच्या भेद माऱ्यासमोर तग धरता आला नाही. 
 
त्यामुळे आता लखनऊ साखळी फेरीतील पराभवाचा बदला घेणार की आरसीबी मुंबईने दिलेल्या संधीचं सोनं करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारणार, याकडे लक्ष असणार आहे. 


आरसीबीची टीम : 


फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली,  दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलन, रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, वानिंदु हसारंगा, शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, शेरफेन रदरफोर्ड, सुयश प्रभुदेसाई, अनीश्वर गौतम डेविड विली, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जोश हेझलवूड, जेसन बेहरनडॉर्फ, चामा मिलिंद, कर्ण शर्मा आणि सिद्धार्थ कौल.


लखनऊ सुपर जायंट्स टीम :


केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, मनन वोहरा, इविन लुईस, मार्क्स स्टोइनिस, जेसन होल्डर, दीपक हुड्डा, क्रुणाल पंड्या, के गौतम, आयुष बदोनी, काइल मेयर्स, करण शर्मा, रवी बिश्नोई, एंड्रयू टाय, आवेश खान, अंकित राजपूत, दुष्मंता चामीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान आणि मयंक यादव.