LSG vs RCB | पाटीदारचं धमाकेदार शतक, लखनऊला विजयासाठी 208 रन्सचं टार्गेट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Chellengers Banglore) लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) विजयासाठी 208 धावांचे मजबूत आव्हान दिलंय.
कोलकाता : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Chellengers Banglore) लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) विजयासाठी 208 धावांचे मजबूत आव्हान दिलंय. आरसीबने (Rcb) 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. रजत पाटीदारने (Rajat Patidar) केलेल्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने 200 पार मजल मारली. रजत पाटीदारने 112 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने नाबाद 37 आणि आणि विराट कोहलीने 25 धावांचं योगदान दिलं. (ipl eliminator 2022 lsg vs rcb royal challerngers banglore set 208 runs target for lucknow super giants rajat patidar shine)
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जॉश हेजलवुड.
लखनऊ सुपर जायंट्सचे शिलेदार : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), एविन लुइस, दीपक हुड्डा, मनन वोहरा, मार्कस स्टोयनिस, क्रुणाल पंड्या, दुश्मंता चमीरा, आवेश खान, मोहसिन खान आणि रवी बिश्नोई.