मुंबई : IPL Final 2021 : आज दसरा. दुसरीकडे आज संध्याकाळी आयपीएल 14 व्या हंगामातील अंतिम सामना रंगणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये (Kolkata Knight Riders) हा अंतिम सामना होणार आहे. (IPL 2021 CSK vs KKR ) या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. (IPL Final 2021 : Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात मैदानावर क्रिकेट युद्ध पाहायला मिळणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दुबई क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे.  


अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या विजेतेपदापासून रोखण्याचे कडवे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सपुढे असणार आहे. आकडेवारीची तुलना केल्यास ‘आयपीएल’मध्ये नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईचे पारडे जड आहे. मात्र, नऊपैकी फक्त तीनवेळा त्यांना जेतेपदात रूपांतर करता आलं. मात्र, कोलकाताने अंतिम फेरी गाठल्यावर दोन्ही वेळा विजेतेपद निश्चितपणे जिंकले आहे. त्यामुळे जेतेपदाचे सोने कोण लुटणार, ही उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.


IPL च्या 14व्या हंगामात महेंद्रसिंह धोनी याची चेन्नई सुपर किंग्स आणि इयान मॉर्गन याची कोलकाता नाईट रायडर्स विजेतेपदासाठी दावा करत आहे. चुरशीच्या लढती कोलकाताने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला बाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईची टीम तब्बल नवव्यांदा तर कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 


दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स तब्बल नऊ वर्षांनंतर अंतिम फेरीत एकमेकांनविरोधात लढणार आहेत. 2012 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईला नमवत आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले होते. त्याता कोण विजेतेपद जिंकणार याची उत्सुकता आहे.