मुंबई : आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये धोनीच्या चेन्नईनं हैदराबादचा पराभव करत फायनल गाठली. तर एलिमिनेटरमध्ये कोलकात्यानं राजस्थानचा पराभव केला. आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कोलकाता आणि हैदराबादमध्ये मॅच होणार आहे. २५ मे रोजी कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये ही मॅच होईल. या मॅचमध्ये जी टीम जिंकेल ती चेन्नईविरुद्ध फायनल खेळेल. २७ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर फायनल खेळवली जाईल. आयपीएल फायनलमध्ये चेन्नई ही एकमेव टीम पोहोचली आहे. पण आयपीएलची फायनल फिक्स आहे का असा सवाल सोशल नेटवर्किंगवर विचारण्यात येत आहे. हा सवाल विचारत असतानाच यूजर्सनी एका व्हिडिओचा दाखला दिला आहे. हॉटस्टारवर आयपीएल फायनलच्या प्रोमोमध्ये कोलकाता आणि चेन्नईच्या टीम दाखवण्यात आला आहे. याच प्रोमोवरून सोशल नेटवर्किंगवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर केला असला तरी हॉटस्टारनं मात्र आता हा व्हिडिओ काढून टाकल्याचं दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची पुष्टी आम्ही करत नाही.