DC vs GT : आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) त्यांच्यात घरच्या मैदानावर गुजरातने पराभवाचा धक्का दिला. दिल्लीचा हा दुसरा पराभव ठरला आहे. गुजरातने तब्बल सहा विकेटने दिल्ली  कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. पहिली बॅटिंग करणाऱ्या दिल्लीने 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. तर विजयाचं हे आव्हान गुजरात टायटन्सने 4 विकेट गमावत पार केलं. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो युवा साई सुदर्शन.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातची दमदार फलंदाजी
दिल्लीने गुजरातसमोर विजयासाठी 162 धावांचं ठेवलं होतं. विजयाचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या गुजरात टायटन्सची सुरुवात निराशजनक झाली. ओपनिंगला आलेले ऋधीमान साहा आणि शुभमन गिल मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. दिल्लीच्या नॉर्जेने एकामागोमाग एक धक्के दिले. दोघंही प्रत्येकी 14 धावांवर बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्या अवघ्या 5 धावा करत बाद झाला. दिल्लीचं पारडं जड वाटत असतानाच साई सुदर्शन संघासाठी धावून आला. 


युवा साई सुदर्शनने एका बाजूला खंबीरपणे उभं राहात स्कोअर बोर्ड हलता ठेवला. त्याला विजय शंकर आणि डेव्हिड मिलरची चांगली साथ मिळाली. विजय शंकर 29 धावा करुन बाद झाला. तर डेव्हिड मिलर 31 धावांवर नाबाद राहिला. पण विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो साई सुदर्शन. सुदर्शनने 48 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकार लगावत नाबाद 62 धावांची विजयी खेळी केली. दिल्लीतर्फे एनरीच नॉर्जेने दोन विकेट घेतल्या. तर खलील अहमद आणि मिचेल मार्शने प्रत्येकी एक विकेट घेतली


दिल्लीची इनिंग
गुजरात टायटन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्ययाचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉने फलंदाजीला सुरवात केली. पण सामन्याच तिसऱ्याच षटकात गुजरातच्या मोहम्मद शमीने दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वी शॉ अवघ्या 7 धावा करुन बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान आणि अक्षर पटेल वगळता एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. दिल्लीने निर्धारित 20 षटकात 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. गुजराततर्फे मोहम्मद शमी आणि राशीद खानने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.


गुजरात पॉईंट टेबलमध्ये अव्वल
सलग दुसऱ्या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. गुजरातच्या खात्यात चार पॉईंट्स जमा झाले आहेत. तर दिल्ली दोन पराभवांनंतर आठव्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर आहेत.