IPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.
Rahul Dravid Head Coach Of Rajasthan Royals : भारतीय क्रिकेट संघाचा माजी हेड कोच असलेल्या राहुल द्रविडने त्याची कारकीर्द संपल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुनरागमन केलं आहे. राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे. आयपीएलच्या अनेक फ्रेंचायझी राहुल द्रविड याला हेड कोच म्हणून आपल्या टीमशी जोडण्यास उत्सुक होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका फ्रेंचायझीने तर राहुलला ब्लँक चेक ऑफर केला होता, मात्र त्याने ही ऑफर नाकारली आणि तो त्याची जुनी फ्रेंचायझी राजस्थान सोबत जोडला गेला.
क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी राहुल द्रविडने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. त्यानंतर तो काहीकाळ राजस्थानचा मेंटॉर देखील होता. मात्र त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कोच झाल्यावर त्याने आयपीएलमधून माघार घेतली. आता राहुल द्रविड आयपीएल 2025 मध्ये राजस्थानचा हेड कोच म्हणून दिसणार असून तब्बल 7 वर्षांनी तो पुन्हा राजस्थान रॉयल्स सोबत जोडला गेला आहे. राहुल द्रविडने आपल्या हेड कोच पदाच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेट संघाला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिला यामुळे त्याचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. टीम इंडियात राहुल द्रविडची हेड कोच पदाची कारकीर्द ही यशस्वी ठरली. तो हेड कोच असताना टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक दिली होती.
हेही वाचा : मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट
ब्लॅंक चेकची ऑफर नाकारली :
Cricbuzz च्या एका रिपोर्टनुसार, वर्ल्ड चॅम्पियन कोचला इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या संघाशी जोडण्यासाठी एक हाय प्रोफाइल फ्रेंचायझी खूप प्रयत्न करत होती. कोणत्याही किंमतीवर त्यांना राहुलला आपल्या संघाशी जोडायचे होते यासाठी त्यांनी त्याला ब्लॅंक चेक सुद्धा ऑफर केला होता. मात्र राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीशी जुने संबंध असल्याने राहुलने ब्लॅंक चेकची ऑफर नाकारली आणि तो पुन्हा राजस्थान रॉयल्स सोबत जोडला गेला.
राहुल द्रविडची आयपीएलमधील कारकीर्द :
राहुल द्रविडने आयपीएलमध्ये एकूण 89 सामने खेळले असून यात त्याने 2174 धावा केल्या असून यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससाठी 46 सामने खेळले असून 34 सामन्यात त्याने संघाचं नेतृत्व केलं.