Mumbai Indians Post Photo On Ganesh Chaturthi : आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन काही महिन्यातच पार पडेल. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल फ्रेंचायझींना या ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघातील 6 खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. मागील वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे रोहित हा मुंबई इंडियन्सवर नाराज असल्याची चर्चा होती. रोहितला मुंबई इंडियन्स येत्या सीजनसाठी रिटेन करणार नाही असे सुद्धा अनेकांचे मत होते. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने एक फोटो पोस्ट करून याबाबत हिंट दिली आहे.
मुंबई इंडियन्सने गणेशचतुर्थीच्या दिवशी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या माध्यमातून चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हा फोटो AI द्वारे बनवला गेला असून यात महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असणाऱ्या कर्णधार हरमनप्रीत कौर, ऑल राउंडर अमेलिया केर तसेच आयपीएल संघातील रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव दिसत आहेत. हा फोटो पाहून मुंबई यंदाही रोहित शर्माला रिटेन करणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्याच पाहायला मिळतंय. रोहित शर्मा सह हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादवला सुद्धा रिटेन करणार असं बोललं जातंय. बाप्पाच्या साक्षीने मुंबई इंडियन्सने रोहितबाबत ही हिंट दिल्याचं कळतंय.
भारताचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा मागील 11 वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्याच्या नेतृत्वात मुंबईने तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मात्र गेल्यावर्षी रोहितला कर्णधार पदावरून काढल्यापासून रोहित आणि मुंबई फ्रेंचायझीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. त्यातूनच रोहित आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शन आधी मुंबई इंडियन्समधून बाहेर पडेल असेल बोलले जात होते. त्यामुळे आयपीएलमधील इतर फ्रेंचायझी त्याला घेण्यासाठी उत्सुक होत्या. मेगा ऑक्शनमध्ये रोहित शर्मावर 50 कोटींपर्यंतची बोली सुद्धा लागू शकते असे बोललेलं जात होते.
हेही वाचा : कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम
रोहित शर्माचे आयपीएल पदार्पण हे डेक्कन चार्जर्स या टीममधून झाले होते. 2011 रोजी झालेल्या ऑक्शनमध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 रोजी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. रोहितने आयपीएलमध्ये 158 सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले, यापैकी 87 सामने जिंकण्यात त्यांना यश आले. रोहितने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले असून यात 6628 धावा केल्या आहेत. यासह त्याने 48 अर्धशतक आणि 2 शतक ठोकली आहेत.
BRN
(20 ov) 209/5
|
VS |
TAN
215/4(19.2 ov)
|
Tanzania beat Bahrain by 6 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.