IPL 2021: या दिवसापासून सुरु होऊ शकतात सामने, यंदा कुठे होणार आयपीएलचे आयोजन?
इंडियन प्रीमियर लीग 2020 चे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले होते.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2020 चे आयोजन युएईमध्ये अत्यंत यशस्वी पद्धतीने केले गेले होते. भारतातील कोविड 19 ची स्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता, परंतु आता भारतात कोरोना संसर्गाची स्थिती बरीच सुधारली आहे आणि यामुळे बोर्ड आता भारतातच आयपीएल 2021 आयोजित करण्यासाठी उत्सुक आहे.
आयपीएल 2021 ची सुरुवात कधी होणार याबाबत इनसाइड स्पोर्टच्या अहवालानुसार 11 एप्रिलपासून आयपीएल 2021 आयोजित केला जाऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल घेईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यात क्रिकेट मालिका मार्चमध्ये संपेल आणि त्यानंतर आयपीएलच्या 14 व्या सत्राला सुरुवात होईल. या दरम्यान टीम इंडियाच्या खेळाडूंनाही ब्रेक मिळेल. अंतिम सामना 5 किंवा जून रोजी खेळला जाईल.
बीपीसीआयचे कोषाध्यक्ष अरुणसिंग धुमल म्हणाले होते की आयपीएलचे आयोजन स्वतः भारतात करावे आणि आम्ही यावर काम करत आहोत आणि मला विश्वास आहे की आम्ही आमच्या देशात ते आयोजित करू शकू. यावेळी, आम्ही आयपीएल इतरत्र आयोजित करण्याचा विचार करीत नाहीये. सध्या भारत युएईपेक्षा सुरक्षित आहे. भारतात कोविडची स्थिती स्थिर आहे आणि परिस्थिती आणखी सुधारेल अशी अपेक्षा आहे.
बीसीसीआयने आयपीएल 2021 स्पर्धेच्या ठिकाणांच्या नावांवरही विचार केला आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबर्ड स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि नवी मुंबईतील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा देखील या यादीत समावेश आहे. याशिवाय अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडियममध्ये नॉकआऊट सामन्यांचे आयोजन केलं जावू शकतं.