भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा आयपीएलची मॅच १२ कोटींनी महाग
स्टार इंडियानं पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क घेतले आहेत.
मुंबई : स्टार इंडियानं पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क घेतले आहेत. यासाठी स्टार इंडियाला तब्बल १६,३४७.५ कोटी रुपये द्यावे लागले आहेत. २०१८ ते २०२२ या कालावधीमध्ये स्टार इंडिया आयपीएलच्या मॅच प्रसारित करणार आहेत.
आयपीएलची एक मॅच आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा १२ कोटी रुपयांनी महाग असणार आहे. स्टार इंडिया आयपीएलच्या एका मॅचसाठी ५५ कोटी रुपये खर्च करणार आहे. भारतात होणाऱ्या सगळ्या आंतरराष्ट्रीय मॅचचे हक्कही स्टारकडेच आहेत. या आंतरराष्ट्रीय मॅचसाठी स्टार ४३ कोटी रुपये देतं. त्यामुळे भारतातल्या आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा बीसीसीआयला आयपीएलमधून जास्त उत्पन्न मिळणार आहे.
आयपीएलच्या वार्षिक मी़डिया अधिकारांमुळे होणारी कमाई ५० कोटी ८० लाख एवढी आहे. ही कमाई बीसीसीआय, इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वर्षभराच्या एकूण कमाई एवढी आहे.
याआधी स्टार इंडियानं भारतात होणाऱ्या मॅचच्या प्रसारणाचे हक्कही मिळवले होते. २०१२-२०१८ या कालावधीमध्ये भारतात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅचच्या प्रसारणासाठी स्टार इंडियानं ३,८५१ कोटी रुपये दिले आहेत.