मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) युवा खेळाडू मालामाल झाले. खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला अनुभवी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी किंवा त्यांना अधिक रक्कम देण्यासाठी फ्रँचायजी उत्सूक नसल्याचं चित्र दिसून आलंय. टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कमी रक्कम मिळाली आहे. (ipl mega auction 2022 day 2 kkr buy ajinkya rahane in based price 1 crore rupees) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणेला त्याच्या बेस प्राईजवर (Base Price) एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही. रहाणेला फक्त या मोसमासाठी अवघे 1 कोटी रुपये मिळाले.  कोलकाताने अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. अजिंक्य गेल्या काही काळापासून सातत्याने अपयशी ठरतोय. अजिंक्यला वनडे आणि टी 20 संघात स्थान नाही. त्यात तो कसोटीतही अपयशी ठरतोय. अंजिक्यला याच ढिसाळ कामगिरीचा फटका बसला आहे.


रहाणेची आयपीएल कारकिर्द


रहाणेने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 151 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 121.34 च्या स्ट्राईक रेटने आणि 31.53 च्या सरासरीने 3 हजार 248 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 2 शतक आणि 28 अर्धशतकं लगावली आहेत.