मुंबई : IPL 2022 च्या मेगा लिलावात पुन्हा एकदा अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये एकूण 10 संघ खेळणार असल्याने अधिक चुरस वाढणार आहे. आज झालेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरपासून शिमरॉन हेमायरपर्यंत अनेक खेळाडूंना अनेक पटींनी जास्त पैसे मिळाले आहेत. त्याचबरोबर पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर यांसारख्या खेळाडूंना याचा फटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव बंगळुरूमध्ये सुरू आहे. लिलावाच्या सुरुवातीला मोठ्या खेळाडूंवरच बोली लावली जाते. या लिलावात इशान किशन हा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटींना विकत घेतले. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरला कोलकाता संघाने 12.25 कोटींना विकत घेतले आहे. त्याला त्याच्या बेस किमतीच्या सहा पट रक्कम मिळाली आहे. अय्यर व्यतिरिक्त कागिसो रबाडाला जवळपास पाचपट तर शिखर धवनला मूळ किमतीपेक्षा चारपट जास्त पैसे मिळाले आहेत.


ईशान किशनला सातपट जास्त पैसे


यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला त्याच्या मूळ किमतीपेक्षा साडेसातपट जास्त पैसे मिळाले आहेत. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, पण त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले. किशन हा यापूर्वीही मुंबईच्‍या संघात होता. तो रोहितसोबत मुंबईसाठी इनिंगची सुरुवात करू शकतो किंवा मधल्या फळीत खेळू शकतो.


हसरंगाची किंमत मूळ किमतीच्या दहापट


श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगा याला मूळ किमतीच्या दहापट भाव मिळाला. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला आरसीबी संघाने 10.75 कोटींना विकत घेतले. हसरंगा त्याच्या लेगस्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2021 च्या T20 विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केली होती.


श्रेयस अय्यर श्रीमंत


मेगा लिलावात श्रेयस अय्यरने मोठी कमाई केली आहे. दोन कोटींची मूळ किंमत असलेल्या श्रेयस अय्यरला सहापट किंमत मिळाली आहे. कोलकाता संघाने त्याला 12.25 कोटींना खरेदी केले.


वॉर्नर, डी कॉक आणि शमीला तिप्पट किंमत


डेविन वॉर्नर, क्विंटन डी कॉक आणि मोहम्मद शमी यांची मूळ किंमत 20 दशलक्ष होती. या सर्व खेळाडूंना तिप्पट किंमत मिळाली आहे. वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटींना, डी कॉकला लखनौने 6.75 कोटींना आणि शमीला गुजरातने 6.25 कोटींना विकत घेतले. फाफ डू प्लेसिसलाही तिप्पट भाव मिळाला आहे. त्याला आरसीबीने 7 कोटी रुपयांना विकत घेतले.


शिखर धवनला चौपट रक्कम


शिखर धवनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला पंजाब किंग्जच्या संघाने 8.25 कोटी रुपये मोजून चारपट जास्त किंमत देऊन विकत घेतले.