मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठीचा 2 दिवसीय मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) पार पडला. या ऑक्शमध्ये अनेक युवा खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली. अनेक खेळाडू हे मालामाल झाले. यामध्ये असे काही खेळाडू होते ज्यांनी क्रिकेटमध्ये येण्यासाठी कठोर संघर्ष केला. असाच एक खेळाडू हा कोट्यधीश झाला आहे. फ्रंचाईजीने या खेळाडूवर पैशांचा पाऊस पाडला. (ipl mega auction 2022 mumbai indians bought electrician son tilak verma in  1 crore 70 lakh rupees)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिळक वर्मा नम्बूरी नागराजू असं या 19 वर्षीय खेळाडूचं नाव आहे. टिळकचे वडिल हे इलेक्ट्रिशयन. मुलाचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. अखेर आपल्या मुलावर कोटीची बोली लागल्याने टिळक आणि त्याच्या वडिलांच्या मेहनतीचं चीज झालं आहे. 


टिळकला मुंबईने खरेदी केलं आहे. मुंबईने टिळकवर 1 कोटी 70 लाख रुपयांती बोली लावत आपल्या ताफ्यात घेतलं.
 
यशाचं श्रेय कोणाला?


टिळकने या साऱ्या यशाचं श्रेय त्याचे प्रशिक्षक सलाम बायश यांना दिलं आहे. सलाम बायश यांनी टिळकमधील क्रिकेटपटूचं गुण हेरत त्याला आवश्यक ते प्रशिक्षण दिलं. दरम्यान आता टिळकला मुंबईकडून प्लेइंग इलेव्हमध्ये खेळण्याची संधी मिळणार का, याकडे सर्वाचंच लक्ष असणार आहे.,