मुंबई : आयपीएलच्या 16 व्या मोसमाला (IPL 2022) अजून काही महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी मिनी ऑक्शनची (Ipl Mini Auction) तयारी सुरु आहे. आगामी 16 व्या हंगामासाठी 23 डिसेंबरला कोच्चीत (Kocchi) मिनी ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने खेळाडू शॉर्टलिस्टेड केले आहेत. या मिनी ऑक्शनसाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. आयपीएलने यापैकी 405 खेळाडूंनी निवड केली आहे. आयपीएलने ट्विट करत ही यादी जाहीर केली आहे. सुरुवातीला प्रारंभिक यादीत 10 संघांपैकी 369 खेळाडूंची निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर 10 संघांनी 36 अतिरिक्त खेळाडूंचा समावेश करण्याचा आग्रह केला. यानंतर या खेळाडूंची नावं अंतिम यादीत जोडली गेली. तर ऑक्शनआधीच 586 खेळाडूंची निवड न झाल्याने बाहेर फेकले गेले आहेत. (ipl mini auction 2023 bcci announced 405 players final list)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 23 डिसेंबरला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. या ऑक्शनमध्ये  405 खेळांडूमध्ये 273 भारतीय तर 132 परदेशी खेळाडूंची समावेश आहे. तर 4 असोसिएट राष्ट्राच्या खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. या ऑक्शनमध्ये 119 कॅप्ड आणि 282 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे.  कॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेलेल खेळाडू.


ते 87 खेळाडू कोण?


या 16 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शनमधून 405 पैकी 87 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकपणे अनसोल्ड खेळाडूंचा आकडा हा मोठा असणार आहे. या यादीत 19 विदेशी खेळाडूंची बेस प्राईज ही 2 कोटी आहे. तर 11 खेळाडूंची बेस प्राईज ही 1 कोटी 50 लाख रुपये इतकी आहे. तर 20 खेळाडूंनी आपली किंमत 1कोटी इतकी ठेवली आहे. थोडक्यात सांगायचं तर या खेळाडूंचा जेव्हा लिलाव सुरु होईल तेव्हा त्यांच्या बेस प्राईजपासून ही बोली लावली जाईल. 



सर्वात जास्त रक्कम कुणाकडे? 


काही दिवसांआधी प्रत्येक संघाने रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली होती. त्यानंतर प्रत्येक संघाकडे एक ठराविक रक्कम शिल्लक राहिली. त्यानुसार आताच्या घडीला सर्वाधिक रक्कम ही हैदराबादकडे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स आहे. लखनऊ आणि मुंबई अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी रक्कम ही कोलकाताकडे आहे.


टीमनिहाय रक्कम


हैदराबाद : 42 कोटी 25 लाख. 


पंजाब : 32 कोटी 2 लाख. 


लखनऊ : 23 कोटी 35 लाख. 


मुंबई : 20 कोटी 55 लाख.  


चेन्नई : 20 कोटी 45 लाख. 


दिल्ली : 19 कोटी 45 लाख. 


गुजरात : 19 कोटी 25 लाख. 


राजस्थान : 13 कोटी 2 लाख. 


बंगळुरु :  8 कोटी 75 लाख. 


कोलकाता : 7 कोटी 5 लाख.