मुंबई : आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन टीमचा सहभाग होणार आहे. त्यामध्ये अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन टीम असणार आहेत. त्यामुळे या 2 नवीन फ्रँचायझींसाठी खेळाडू निवडण्याचे नियम काय असतील, हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की, आहे त्याच टीममधील खेळाडू घेतले जातील की, मग नवीन खेळाडूंचा यामध्ये समावेश होईल? या सगळ्याबद्दल आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात काही माहिती सांगणार आहोत.


नवीन टीमना मिळणार विशेष परवानगी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, नवीन फ्रँचायझी आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी खेळाडूंच्या पूलमधून 3-3 क्रिकेटपटू निवडण्याची संधी मिळू शकते.


या कंपन्यांचे 2 नवीन टीम


RP-SG ग्रुप आणि CVC कॅपिटलने अनुक्रमे लखनऊ आणि अहमदाबाद फ्रँचायझी विकत घेतल्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात 10 टीम असतील. या वर्षी डिसेंबरमध्ये एक मोठा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये फ्रँचायझी त्यांच्या मुख्य संघाची पुनर्रचना करतील.


बीसीसीआय समान संधी देणार का?


सर्व टीमना समान संधी देण्यासाठी, BCCI दोन नवीन फ्रँचायझींना (लखनौ आणि अहमदाबाद) लिलावापूर्वी विद्यमान पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्याचा विचार करत आहे.


नवीन संघांसाठी विशेष नियम का?


खेळाडूंना कायम ठेवण्याच्या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ आयपीएल अधिकाऱ्याने सांगितले की, 'यामागील तर्क म्हणजे नवीन संघांना 'कोअर' तयार करण्याची संधी देणे. जे त्यांना संघ बांधणीसाठी मदत करेल आणि त्यामुळे टीमला आपला चांगला खेळ दाखवण्याची देखील संधी मिळेल.