MI vs RCB IPL Points Table 2023: मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सदरम्यान (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यंदाच्या इंडियन प्रिमिअर लिगमधील 54 वा सामना (IPL 2023) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपले शेवटचे सामने गमावल्याने हा सामना जिंकण्याच्या उद्देशानेच ते मैदानात उतरतील यात शंका नाही. एकंदर आकडेवारीमध्ये मुंबईचं पारडं जड वाटत असलं तरी मागील 5 सामन्यांमध्ये आरसीबीचा संघ मुंबईपेक्षा वरचढ राहिला आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे सध्याची पॉइण्ट्स टेबलची स्थिती पाहिल्यास या एका विजयाच्या जोरावर दोन्ही संघांना पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या स्थानी झेप घेऊ शकेल. या सामन्यापूर्वीचं पॉइण्ट्स टेबलचं गणित कसं आहे आणि कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात...


कोणता संघ कोणत्या स्थानी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉइण्ट्स टेबलमध्ये सध्या गुजरातचा संघ 11 पैकी 8 सामने जिंकून 16 पॉइण्टसहीत पहिल्या स्थानी आहे. त्या खाळोखाल 6 विजयांसहीत चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या दोन संघांनंतर पुढील 6 संघ हे प्रत्येक 5 विजयांसहीत समान स्थानावर आहेत. या संघांची पॉइण्ट टेबलमधील स्थान हे नेट रनरेटवर निश्चित करण्यात आलं आहे. पॉइण्ट टेबलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा संघ तिसऱ्या, राजस्थान चौथ्या स्थानी आहे. तर कोलकात्याच्या संघ पाचव्या स्थानी असून त्या खालोखाल सहाव्या स्थानी आरसीबीचा संघ आहे. सातव्या स्थानी पंजाब असून आठव्या स्थानी मुंबईचा संघ आहे. म्हणजेच आजच्या सामन्यात आरसीबीने विजय मिळावला तर ते थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतील. मुंबईलाही थेट 5 स्थानांनी झेप घेण्याची संधी आजच्या सामन्यात आहे.


मागील 5 सामन्यांमधील दोन्ही संघाची कामगिरी कशी?


मागील 5 सामन्यांपैकी आरसीबीने 3 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला मात्र मागील 5 सामन्यांपैकी दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. नवव्या स्थानी हैदराबाद आणि दहाव्या स्थानी दिल्लीचा संघ आहे. आजच्या सामन्यामधील जय पराजयाचा तळाच्या दोन्ही संघांवर कोणताही परिणाम होणार नाही. 


नक्की वाचा >> IPL 2023 Sixes: सर्वाधिक Six मारणाऱ्या संघांच्या यादीत KKR अव्वल! पाहा Mumbai Indians कितव्या स्थानी



कुठे पाहता येणार सामना?


आजचा हा सामना वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरु होईल. जीओ सिनेमाबरोबरच हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वाहिन्यांवर लाइव्ह पाहता येईल.