IPL Point Table : राजस्थानसाठी प्लेऑफचं गणित सोपं, कशी आहे पाईंट्स टेबलची स्थिती?
IPL Points Table Scenario : पंजाबचा धुव्वा उडवल्यानंतर (RR vs PBKS) आता राजस्थानसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. राजस्थान पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा
Rajasthan Royals Playoff Scenario : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा (RR vs PBKS) पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं 20 षटकांत 8 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सनं 19.5 षटकांत 7 गडी गमावून आव्हान पूर्ण केलं अन् पाचवा विजय मिळवला आहे. राजस्थानच्या या विजयामुळे आता संजू अँड कंपनीचं प्लेऑफचं गणित अधिकच सोपं झालं आहे. राजस्थान पहिल्या सामन्यापासून पाईंट्स टेबलच्या टॉपवर आहे. अशातच आता पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर देखील आरआरचा संघ 10 अंकासह अव्वल (IPL Points Table Scenario ) स्थानी आहे.
पाईंट्स टेबलची सध्याची स्थिती
राजस्थान रॉयल्सचा संघ 6 सामन्यात 5 विजय मिळवून पाईंट्स टेबलवर राज्य करत आहे. त्यांच्याकडे 10 अंक जमा झाले आहेत. 0.767 चा नेट रननेट असल्याने राजस्थान मजबूत स्थितीत आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स 1.528 चा नेट रननेट अन् 6 गुणासह दुसऱ्या स्थानी आहे. त्याचबरोबर चेन्नई देखील 6 अंकासह 0.666 च्या नेट रननेटने तिसऱ्या स्थानावर आहे. तर लखनऊचा संघ 6 अंक अन् 0.436 च्या नेट रननेटमुळे चौथ्या स्थानी आहे. तर हैदराबाद आणि गुजरात 6-6 अंकासह अनुक्रममे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे.
पाईंट्स टेबलच्या खालच्या बाजूला नजर टाकली तर, मुंबई इंडियन्स 4 अंक आणि -0.073 नेट रननेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पंजाब आजच्या सामन्यानंतर 4 गुणांसह आठव्या स्थानी आहे. मात्र, पंजाबचा ननेट रननेट घसरलाय. तर दिल्ली 9 व्या स्थानी -0.975 अंकासह आहे. आरसीबीला अद्याप एकच विजय मिळता आलाय. गेल्या चार सामन्यातील पराभवामुळे आरसीबी पाईंट्स टेबलच्या अखेरच्या स्थानावर आहे.
राजस्थानचं प्लेऑफचं गणित
राजस्थानने चांगली सुरूवात केल्याने आता त्यांचं प्लेऑफ निश्चित मानलं जातंय. पहिल्या 6 सामन्यात 5 विजय मिळवून राजस्थानचं अर्ध काम झालंय. आता राजस्थानचं प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित 8 सामन्यात कमीतकमी 2 ते 3 विजय मिळवावा लागेल. राजस्थानची सध्याची टीम आणि परफॉर्मन्स पाहता राजस्थान यंदा प्लेऑफ गाठेल, हे निश्चित मानलं जातंय.
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, केशव महाराज, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम करन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.