IPL Point table : विक्रमी विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा, आरसीबीच्या प्लेऑफचं गणित फिसकटलं?
IPL Points Table Scenario : आरसीबीचा धुव्वा उडवल्यानंतर (SRH vs RCB) आता बंगळुरूसाठी प्लेऑफचं (IPL 2024 Playoff) गणित अधिकच सोप्पं झालंय. हैदराबाद पाईंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानावर पाहा
Royal Challengers Bengaluru Playoff Scenario : फलंदाजीसाठी पुरक अशा चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर हैदराबादने आरसीबीचा खात्मा केला. 43 फोर अन् 38 सिक्स खेचलेल्या या सामन्यात हैदराबादने आयपीएल इतिहासातील 287 धावांचा सर्वात मोठा स्कोर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आरसीबीने देखील 262 धावा कुटल्या खऱ्या पण 25 धावा आखूड राहिल्याने आरसीबीला पराभव पत्करावा लागला. आरसीबीला सलग 6 सामन्यात पराजय झाल्याने आता प्लेऑफचं गणित फिसकलं (IPL Points Table Scenario) आहे. पाईंट्स टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या आरसीबीला आता प्लेऑफ जवळजवळ खेळता येणार नाही.
पाईंट्स टेबल गणित
राजस्थान रॉयल्सचा पाईंट्स टेबलवर दबदबा कायम आहे. राजस्थान 6 सामन्यातील 5 विजयासह 10 अंक नावावर केलेत. तर दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात 5 सामन्यातील 4 विजयासह 8 अंक आहे. केकेआरचा नेट रननेट +1.688 आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज देखील 8 अंक अन् 0.726 नेट रननेटसह टॉप 4 मध्ये आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयानंतर देखील +0.502 नेट रनरेटसह 8 अंक खात्यात जमा केले आहेत.
पाईंट्स टेबलमध्ये, लखनऊ सुपर जाएन्ट्सचा संघ 6 अंकासह 5 व्या स्थानी आहे. तर गुजरातचा संघ देतील -0.637 अंकासह 6 व्या स्थानी कायम आहे. तर सातव्या क्रमांकावर 4 अंकासह पंजाब किंग्जचा संघ आहे. तर आठव्या स्थानावर 6 सामन्यात दोन विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ आहे. तर नवव्या स्थानी दिल्लीने जागा कायम राखलीये. दिल्लीचा संघ 6 सामन्यातील 4 अंकासह -0.975 नेट रननेटसह आव्हान टिकवलंय. तर सलग 6 व्या पराभवानंतर आरसीबीचा संघ 10 क्रमांकावर फेकला गेलाय. आरसीबीकडे -1.185 नेट रनरेट आहे.
आरसीबीचं प्लेऑफ गणित कसं?
आरसीबीने आत्तापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना एकच विजय मिळवता आलाय. तर 7 सामने अजून आरसीबीचे बाकी आहेत. त्यामुळे आता जर आरसीबीला प्लेऑफ गाठायची असेल तर सर्वच्या सर्व सामने खेळवे लागणार आहेत. आरसीबीला हैदराबादविरुद्ध आणखी एक सामना खेळायचा आहे. तर गुजरातसोबत दोन सामने बाकी आहेत. दिल्ली, चेन्नई आणि पंजाबविरुद्ध एक एक सामने होणार आहेत. त्यामुळे आता आरसीबीसाठी आता प्रत्येक सामना आर या पार असा असेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.