मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक टीम वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरल्या आहेत. यावर्षी चेन्नई आणि राजस्थानच्या टीमनं २ वर्षानंतर कमबॅक केलं आहे. आयपीएलच्या ८ टीमपैकी काही टीमना त्यांची लय सापडली आहे तर काही टीम अजूनही झगडत आहेत. आत्तापर्यंत काही टीमनी ६ तर काही टीमनी ५ मॅच खेळलेल्या आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या टीमना सूर सापडला नाही तर आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण होऊन बसणार आहे. पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर यंदाच्या वर्षी दिल्ली आणि मुंबईच्या टीमना लवकरात लवकर सूर गवसणं गरजेचं आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम सातव्या आणि दिल्लीची टीम आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि दिल्लीनं ५ पैकी १ मॅच जिंकली आहे. त्यामुळे या दोन्ही टीमकडे फक्त २ पॉईंट्स आहेत. नेट रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.


चेन्नई पहिल्या क्रमांकावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईनं ५ पैकी ४ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे धोनीच्या टीमकडे ८ पॉईंट्स आहेत. चेन्नईबरोबरच पंजाबच्या टीमनंही ५ पैकी ४ मॅच जिंकल्या. पण चेन्नईचा नेट रन रेट पंजाबपेक्षा चांगला आहे. 


पॉईंट्स टेबल


टीम मॅच विजय पराभव पॉईंट्स
चेन्नई   ४  १ 
पंजाब
कोलकाता ६ 
हैदराबाद   २
राजस्थान 
बंगळुरू
मुंबई
दिल्ली   ५