IPL Points Table : राजस्थानच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलचे आकडे फिरले, पाहा गुजरातचं काय झालं?
IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
RR vs GT, IPL 2024 : अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातवर 3 गडी राखून मात केली. शेवटच्या बॉलवर दोन धावांची गरज असताना राशिद खानने (Rashid Khan) खणखणीत फोर मारला अन् दोन अंक खिशात घातले आहेत. या सामन्यातील विजयानंतर गुजरात मोठा फायदा झाला असला तरी राजस्थानला कोणताही तोटा झाला नाहीये. गुजरातची गाडी कॅप्टन शुभमन गिलने (Shubman Gill) रेटली अन् चांगली सुरूवात करून दिली. मिडल ऑर्डर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नसल्याने अखेरीस राशिद खान आणि राहुल तेवतिया (Rahul Tewatia) यांच्यावर भर आला. मात्र, दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळी केली सामना खिशात घातला. राजस्थानकडून कुलदीप सेनने 3 विकेट्स घेतल्या अन् युझीने 2 गडी तंबूत धाडले होते. त्याआधी राजस्थान फलंदाजी करताना, रियान आणि संजू या दोघांनी अर्धशतक ठोकलं. गुजरातकडून राशिदने 4 ओव्हरमध्ये केवळ 18 धावा दिल्या अन् 1 विकेट घेतली. तर रियान परागने 48 बॉलमध्ये 76 धावा केल्या. तर संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 68 धावा केल्या. त्यामुळे राजस्थानला 196 धावांचा डोंगर उभारता आला आहे. मात्र, गुजरातने गेम पलटवला. गुजरातच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table Scenario) कोणते बदल झालेत? पाहुया...
कसं आहे पाईंट्स टेबलचं गणित?
पराभवानंतर देखील राजस्थान रॉयल्सने पहिलं स्थान अजूनही सोडलं नाहीये. राजस्थानकडे 5 सामन्यातील 4 विजयासह 8 गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेट मात्र खाली आला आहे. सध्या राजस्थानचा नेट रननेट 0.871 वर आलाय. तर दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर आहे. केकेआरकडे 6 गुण असून त्याचा नेट रनरेट 1.528 आहे. तसेच तिसऱ्या स्थानावर लखनऊचा संघ असून त्यांच्या खात्यात देखील 6 गुण आहेत. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानी कायम आहे. पाचव्या स्थानी मात्र हैदराबादने पाय रोवले आहेत. 6 अंक अन् 0.344 च्या नेट रनरेटसह हैदराबाद टॉप 5 मध्ये आहे. तर गुजरात जाएन्ट्सने 7 व्या क्रमांकावरून 6 व्या स्थानी झेप घेतली आहे.
पाईंट्स टेबलच्या बॉटममध्ये पंजाबला धक्का बसलाय. पंजाबचा संघ 7 व्या स्थानावर घसला आहे. पंजाबचा नेट रननेट -0.196 वर आहे. त्याचबरोबर मुंबईची टीम 8 व्या स्थानी आहे. तर आरसीबीला सुर आवळल्याने आता आरसीबी 5 सामन्यातील 2 अंकासह 9 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर दिल्लीची देखील तीच अवस्था पहायला मिळतेय. दिल्लीला 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवता आलाय. त्यात दिल्ली -1.370 नेट रनरेटसह 10 व्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (C), साई सुधारसन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.