IPL Points Table : एकट्या बटलरने पाजलं तगड्या कोलकाताला पाणी, पाहा कसंय पाईंट्स टेबलचं गणित?
IPL Points Table Scenario : राजस्थान 12 गुणांसह अंकतालिकेत अव्वल स्थानी आहे, तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
IPL Points Table Scenario, RR vs KKR : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2024 मधील 31 वा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. जॉस बटलरने शतकासह संघाला सहावा विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 223 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना राजस्थानने 20 षटकांत आठ गडी गमावून 224 धावा केल्या आणि सामना दोन विकेट्सने जिंकला. नारायणने (Sunil Narine) 13 फोर अन् 6 सिक्सच्या मदतीने 56 बॉलमध्ये खणखणीत 109 धावा कुटल्या. तर राजस्थानकडून जॉस बटलरने (Jos Buttler) 60 बॉलमध्ये 107 धावा केल्या अन् राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थान 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल तर कोलकाता आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
पाईंट्स टेबलचं गणित
राजस्थान रॉयल्स मोठ्या विजयानंतर अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आरआरकडे 12 गुण झाले असून आता प्लेऑफचं गणित अगदी सोपं झालंय. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज देखील 8 अंक अन् 0.726 नेट रननेटसह टॉप 4 मध्ये आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयानंतर देखील +0.502 नेट रनरेटसह 8 अंक खात्यात जमा केले आहेत.
पाईंट्स टेबलमध्ये, लखनऊ सुपर जाएन्ट्सचा संघ 6 अंकासह 5 व्या स्थानी आहे. तर गुजरातचा संघ देतील -0.637 अंकासह 6 व्या स्थानी कायम आहे. तर सातव्या क्रमांकावर 4 अंकासह पंजाब किंग्जचा संघ आहे. तर आठव्या स्थानावर 6 सामन्यात दोन विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ आहे. तर नवव्या स्थानी दिल्लीने जागा कायम राखलीये. दिल्लीचा संघ 6 सामन्यातील 4 अंकासह -0.975 नेट रननेटसह आव्हान टिकवलंय. तर सलग 6 व्या पराभवानंतर आरसीबीचा संघ 10 क्रमांकावर फेकला गेलाय. आरसीबीकडे -1.185 नेट रनरेट आहे.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरीन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.