IPL 2021: श्रेयस अय्यरच्या खांद्याची `या` दिवशी सर्जरी, 5 महिने मैदानापासून दूर राहणार?
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मुंबई: नुकतीच जोफ्रा आर्चरच्या हाताची शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यापाठोपाठ आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेची तारीख ठरली असून त्यानंतर साधारण 4 ते 5 महिने श्रेयसला मैदानापासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे.
पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्या दरम्यान फील्डिंग करत असताना श्रेयसच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर एक्स रे काढण्यात आला. तेव्हा त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं सांगितलं मात्र तारीख निश्चित करण्यात आली नव्हती.
श्रेयस अय्यरवर IPLआधी म्हणजे 8 एप्रिलला शस्त्रक्रिया होणार आहे. या दुखापतीमुळे श्रेयस उर्वरित दोन वन डे आणि IPL देखील खेळू शकणार नसल्याची माहिती मिळाली आहे. श्रेयसच्या दुखापतीची सर्वात मोठी हानी त्याच्या आयपीएल टीम दिल्ली कॅपिटल्सला बसला आहे. आता 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमापासून श्रेयस दूर असणार आहे.
स्पोर्ट्स टुडे रिपोर्टनं दिलेल्या अहवालानुसार श्रेयस संपूर्ण आयपीएल खेळू शकणारच नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर साधारण पाच महिन्यांपर्यंत तो पुन्हा मैदानात खेळू शकणार नाही. दिल्ली कॅपटिल्सच्या कर्णधारपदाची कमान कुणाच्या खांद्यावर द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न आहे.