IPL 2020 : उद्घाटन सोहळ्यासहीत `या` ५ गोष्टी यंदा दिसणार नाहीत
पहिली मॅच होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घेऊया
नवी दिल्ली : इंडीयन प्रिमियर लीगच्या १३ व्या सिझनला आजपासून सुरुवात होतेय. मागच्या वेळचे विजेते मुंबई इंडीयन्स आणि गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना होणारेय. टॉस उडताच १३ व्या सिझनची रणधुमाळी सुरु होईल. सर्व टीम्सनी साधारण महिन्याभर यूएईमध्ये सराव केलाय. कोरोना संकटात हा सोहळा होणं मोठी गोष्ट मानली जातेय. असे असले तरी यावर्षी प्रेक्षकांना काही गोष्टींना मुकावं लागणार आहे. पहिली मॅच होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घेऊया.
उद्घाटन सोहळा रद्द
आयपीएल १२ व्या सीझनप्रमाणे यावेळेसही उद्घाटन समारंभ होणार नाही. यावेळेस कारण बदलले आहे. गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. म्हणून उद्घाटन सोहळा झाला नव्हता. या सर्व खर्चाची रक्कम शहीद जवानांच्या परिवाराला देण्यात आली. यावेळेस कोरोनामुळे उद्घाटन सोहळा रद्द झालाय.
चिअर लिडर्स
आयपीएल सुरु झाली आणि मैदानात खेळाडुंसोबत चिअर्स लीडर्स दिसल्या नाहीत असं झालं नव्हतं. जेवढा आनंद प्रेक्षक बॉलर्स, बॅट्समन, फिल्डर्सचा घेतात तेवढाच आनंद चीअर लीडर्सचा डान्स पाहुनही होत असतो. पण यावेळेस चीअर लीडर्सना देखील बाय बाय करण्यात आलंय. मैदानात कमी कमी उपस्थितीवर लक्ष देण्यात आलंय. त्यामुळे पहिल्यांदाच आयपीएल चीअर लीडर्सच्या अनुपस्थित होतायत.
प्रेक्षक नाहीत
आयपीएलच्या मैदानात पहील्यांदाच प्रेक्षकांच्या जागा रिकाम्या दिसतील. बॅट्समननी सिक्सर मारल्यावर कोणता प्रेक्षक चेंडूचा झेल घेताना दिसणार नाही. तसेच कॉमेंट्री देखील स्टेडीयममध्ये नव्हे तर स्टुडीओत बसून केली जाणार आहे.
टेक्निकल स्टाफ
टीमचा टेक्निकल स्टाफ, व्हिडीओ एनालिस्टची टीम ड्रेसिंग रुममध्ये नसेल. त्यांना प्रेक्षक स्टॅण्डमध्ये वेगळी जागा शोधावी लागेल. खेळाडुंशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी रणनीती आखली जातेय. टीम्सना वेगळी वॉर रुम असणार आहे.
मीडियाला नो एन्ट्री
यावेळी आयपीएलमध्ये किंवा सरावादरम्यान मीडियाला देखील एन्ट्री नसणार. मीडिया आणि खेळाडू एकमेकांना समोरासमोर भेटू शकणार नाहीत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखती होतील. खेळाडू स्वत: येतील की व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगनेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील हे अजून स्पष्ट नाहीय.