मुंबई: पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. धोनीच्या संघातील गोलंदाजांसमोर पंजाबच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. एकामागे एक फलंदाज तंबुत परतत होते. पंजाब संघाला हा सर्वात मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपरकिंग्स संघातील गोलंदाज चाहर आणि जडेजा यांचा जलवा मैदानात पाहायला मिळाला. जडेजानं कधी परफेक्ट थ्रो करत तर कधी सुपरमॅनसारखी उडी मारून कॅच आणि आऊट केल्याचं पाहायला मिळालं. नुकत्याच पार पडलेल्या या सामन्यात दोघांनी मिळून मैदानात धुमाकूळ घातला. 



हा फोटो आहे के एल राहुल क्रिझवर असताना त्याला आऊट करतानाचा. रविंद्र जडेजानं इतका परफेक्ट थ्रो केला आहे की के एल राहुल रनआऊट झाला. रविंद्र जडेजानं केलेल्या रॉकेट थ्रोचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



हा व्हिडीओ देखील तितकाच सुपरहिट आहे. याचं कारण रविंद्र जडेजानं सुपरमॅनसारखी हवेत उडी मारून कॅच घेतला आहे. या आधी राजस्थान संघातील संजू सॅमसन आणि दिल्ली संघातील ऋषभ पंतने अशा पद्धतीनं कॅच घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


पंजाब किंग्स संघाने 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 106 धावा केल्या. तर चेन्नई संघासमोर 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. चेन्नई सुपरकिंग्स संघाने 16व्या ओव्हरमध्येच 6 गडी राखून सामना जिंकला. फाफ डुप्लेसिस आणि मोईन अलीने सर्वाधिक धावा केल्या. डुप्लेसिसने 36 तर मोईननं 46 धावांची खेळी केली आहे.