मुंबई: राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. 3 विकेट्सनं राजस्थान संघ जिंकला आता पुढच्या सामन्यांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघात काही बदल करण्यात आल्याची माहिती संघाचे कोच रिकी पॉटिंग यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरला इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे संघाचं नेतृत्व ऋषभ पंतच्या खांद्यावर देण्यात आलं. मात्र त्याची संघातील जागा रिकामी होती. 8 एप्रिल रोजी श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या ऐवजी संघामध्ये कर्नाटकचा ऑफ स्पिनर अनिरुद्ध जोशीला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. 


दुसरीकडे IPLसामने सुरू होण्यापूर्वी स्टार गोलंदाज अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तो देखील पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. अक्षर अद्यापही खेळण्यासाठी फीट नसल्यानं त्याच्या ऐवजी संघात तात्पुरती रिप्लेसमेंट म्हणून शम्स मुलानीला संधी दिली आहे.


ईशांत शर्मा ऐवजी आवेश खानला संघात संधी का दिली, रिकी पॉटिंग काय म्हणाले ऐकण्यासाठी इथे क्लिक करा


शम्स मुलानी हा ऑलराऊंडर आहे. डाव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये माहीर असलेल्या मुलानीला अक्षर ऐवजी संघात स्थान दिलं आहे. 24 वर्षीय मुलानीने आतापर्यंत 25 टी 20 सामने खेळले आहेत. 


तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ईशांत शर्मा देखील अजून पूर्णपणे फीट न झाल्यानं मैदानात खेळू शकणार नाही. त्याच्या पायाला दुखापत झाल्यानं तो सध्या मैदानात उतरणार नाही. तर राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये आवेश खानला संघातून संधी देण्यात आल्याचं स्पष्टीकरण रिकी पॉटिंग यांनी दिलं आहे. ईशांत शर्मा कोणत्या सामन्यावेळी मैदानात खेळेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.