मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स नुकताच सामना पार पडला. या सामन्यात पंतच्या संघाने हिटमॅनच्या टीमवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. दिल्लीनं IPLमध्ये आपला दबदबा कायम राखला असून आतापर्यंत 3 सामने जिंकले आहेत. पॉइंट टेबलमध्य़े दिल्ली दुसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंत सरावात असो किंवा मैदानात कायमच वेगवेगळी किडेगिरी करताना दिसत असतो. त्याने केलेल्या स्लेजिंगचे अनेक व्हिडीओ देखील प्रसिद्ध आहेत. शांत राहित तो पंत कुठला? पंतने तर रोहित शर्मालाही सोडलं नाही. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत मैदानात टॉसदरम्यान रोहितच्या खोड्या काढताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकल्यानंतर त्याला ऋषभ पंत गुदगुल्या करताना कॅमेऱ्यात कैद झाला. याचा व्हिडीओ IPLने स्वत:ट्वीट केल्यानंतर वेगानं व्हायरल झाला आहे. ऋषभने केलेल्या या गुदगुल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली संघाने 6 विकेट्सनं विजय मिळवला आहे. शिखर धवनचा मैदानात पुन्हा जलवा पाहायला मिळाला. अर्धशतक हुकलं असलं तरी त्याने 45 धावा करून संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. 


25 एप्रिल रोजी आता हैदराबाद विरुद्ध सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. यावेळीतरी हैदराबादला दिल्लीवर विजय मिळवता येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दिल्ली पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.