मुंबई: दिल्ली विरुद्ध चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने मुंबई इंडियन्स संघ पराभूत झाला. या पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. याचं कारण म्हणजे स्लो ओव्हर रेटमुळे चेन्नई प्रमाणेच मुंबईच्या संघाला देखील 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई संघाने दिल्ली कॅपिटल्सला 138 धावांचं लक्ष्य दिलं होतं. दिल्लीच्या गब्बरनं आपला जलवा दाखवला. दिल्ली संघाने 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं आहे. रोहितवर 12 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी रोहितला हा दंड भरावा लागला. 


ठरवून दिलेल्या वेळेत मुंबईच्या टीमने बॉलिंग पूर्ण केली नाही. आयपीएलच्या या मोसमातील यापूर्वी चेन्नईला असा दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माला हा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील ही मुंबईची पहिली चूक आहे. अशी चूक पुन्हा झाली तर संघावर एक सामना खेळण्याचं बंदी देखील घातली जाण्याची शक्यता आहे. 


एका संघाला 90 मिनिटांमध्ये आपले 20 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. यामध्ये 85 मिनिटांत एक डाव संपवला जाईल तर 2.5 मिनिटं प्रत्येक संघाला स्ट्रॅटजिक टाइम आऊट देण्यात आला आहे. सुपरओव्हर देखील 90 मिनिटांत संपवणं अपेक्षित आहे. या नव्या नियमानुसार कर्णधार रोहित शर्माच्या संघाला स्लो ओव्हर रेटसाठी हा दंड आकारण्यात आला आहे.