मुंबई: मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंची खास शैली आहे. या शैलीमुळे कायमच मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू चर्चेचा विषय असतात. आता देखील या खेळाडूची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. याचं कारण म्हणजे त्याची खेळण्याची खास शैली आहे. या शैलीमुळे त्याची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्लेमिंगोसारख्या स्टाइलनं खेळणारे खेळाडू IPLच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामध्ये रोहित शर्मा, ट्रेन्ट बोल्ट, सुर्यकुमार यादव अशा अनेक खेळाडूंची शैली फ्लेमिंगोशी कंपेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या फ्लेमिंगो स्टाइलनं धुमाकूळ घातला आहे.


मुंबई इंडियन्स संघातील ट्रेन्ट बोल्टबद्दल सध्या चर्चा होत आहे. यांचं कारण म्हणजे ट्वीटरवर अनेकांनी फ्लेमिंगोसारखी फलंदाजी करणारा खेळाडू म्हणजे ट्रेन्ट बोल्ट असं म्हटलं आहे.  या स्टाइलनं खेळणाऱ्या अनेक खेळाडूंचे फोटो सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.








आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होत आहे. यंदाच्या हंगामात फ्लेमिंगो स्टाइल कोणाकडून पाहायला मिळणार? ट्रेन्ट बोल्ट पुन्हा या शैलीत दिसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनेकांनी फ्लेमिंगोचे फोटो शेअर करून या स्टाइलनं खेळणाऱ्या प्लेअरचं नाव ओळखा असंही ट्वीटवर शेअर केलं आहे.



अनेकांनी ट्रेन्ट बोल्ट असल्याचं उत्तर देत त्याचे जुने व्हिडीओ शेअर केले आहेत. बोल्टची तुलना फ्लेमिंगोशी यामध्ये करण्यात आली आहे. फ्लेमिंगो जसा एका पायावर उभं राहून आपलं खाद्य शोधतो तशाच पद्धतीनं एका पायावर खेळाडू चेंडू टोलवत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदाही ही स्टाईल बघण्यासाठी सर्वजण आतूर आहेत.


मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेवन
रोहित शर्मा( कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कयरान पोलार्ड, जेम्स नीशम, कृणाल पांड्या, पियुष चावला, राहुल चहर, ट्रेन्ट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह