IPL 2021: शेरास सव्वाशेर! RCBच्या ट्वीटवर पंजाब किंग्सचं जबरदस्त उत्तर
...आणि शेवटी RCB आणि पंजाब किंग्सनं मानले एकमेकांचे आभार
मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू नुकताच IPLमधील पहिला सामना झाला. अटीतटीच्या लढीतमध्ये 2 विकेट्सनं RCB संघाला विजय मिळवण्यात यश आलं. यावेळी एबी डिविलियर्ससोबतच चर्चा झाली ती ग्लॅन मॅक्सवेलनं ठोकलेल्या षटकाराची. 100 मीटर लांब ठोकलेल्या या षटकारानंतर चक्क बॉल स्टेडियमबाहेर गेला.
13 सामन्यांनंतर पहिल्यांदाच इतका जबरदस्त षटकार मारण्यात ग्लॅन मॅक्सवेलला यश आलं. RCB संघाकडून त्याची पहिल्या सामन्यातील कामगिरी जबरदस्त राहिली. त्यानंतर चक्क RCB संघाने ट्वीट करून पंजाब किंग्स संघाचे आभार मानले. यावर त्या दोघांमध्ये झालेला संवाद खूपच रंजक होता. हा संवाद ट्वीटरवर तुफान व्हायरल होत आहे.
मागच्या वर्षी पंजाब किंग्समध्ये असलेल्या मॅक्सवेल चांगली कामगिरी न केल्यानं पंजाबनं त्याला लिलावावेळी रिलीज केलं. त्यानंतर RCB संघानं मोठी किंमत देऊन त्याला आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. त्यामुळे RCB संघानं पंजाबचे आभार मानले आहेत. त्यावर उत्तर म्हणून पंजाबने सरफराज, मयंक सह आणखी काही खेळाडूंना रिलीज केलं आणि त्यांना पंजाब संघात घेता आलं त्यासाठी आभार मानले आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांचे ट्वीट करत आभार मानले.
तर हेलमेट, जर्सी, पॅड आणि लोगो तुम्ही मिस करताय असं जेव्हा RCB म्हणाले त्यावेळी पंजाब संघानं त्यांना जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. या दोन्ही संघांमधील संभाषण ट्वीटवर जबरदस्त व्हायरल होत आहे.