मुंबई: मुंबई इंडियन्स संघ सर्वांनाच आवडणारा. आतापर्यंत 5 वेळा विजयाचा किताब आपल्या नावावर केलेल्या या संघाचा आज रॉयल चॅलेंजर्स संघासोबत IPL2021मधील पहिला सामना चेपॉक स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी जसा मुंबई इंडियन्सनी 5 वेळा जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे तसा एक लाजीरवाणा रेकॉर्डही आपल्या नावावर करून घेतला आहे. मुंबई आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 8 वर्षांपासून एक लाजीरवाणी विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2013 नंतर मुंबई संघानं एकही सामना जिंकला नाही. गेल्या 7 वर्षात मुंबई संघाला एकदाही पहिला सामना जिंकण्यात यश न आल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 2012 मध्ये मुंबई इंडियन्सनं अखेरचा IPLमधील शेवटचा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स जेव्हा जेव्हा चॅम्पियनशिप मिळवली तेव्हा तेव्हा सुरुवातीचा सामना गमवला आहे. त्यामुळे आज मुंबई इंडियन्स जिंकणार की पहिला सामना गमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळीतरी रोहित सेनेला चॅम्पियनशिप मिळवण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मुंबई इंडियन्स संघानं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020मध्ये चॅम्पियनशिप मिळवली आहे. विशेष म्हणजे सर्व ट्रॉफी या रोहित शर्मा कर्णधार असताना मिळाल्या आहेत. त्यामुळे यावेळी देखील चॅम्पियनशिप मिळवण्यात रोहित शर्माला यश मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेवन


रोहित शर्मा( कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कयरान पोलार्ड, जेम्स नीशम, कृणाल पांड्या, पियुष चावला, राहुल चहर, ट्रेन्ट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह