बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम शहिदांच्या कुटुंबीयांसाठी - कर्णधार फैज फजल
शहिदांबद्दल प्रतिक्रिया देताना फैज फजल भावूक झाल्याचे दिसून आला.
नागपूर : विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक आपल्या नावे केला आहे. पहिल्या डावात मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीवर विदर्भाचा विजय झाला आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना विदर्भाचा कर्णधार फैज फजलने एक निर्णय घेतला आहे. शहिदांबद्दल प्रतिक्रिया देताना फैज फजल भावूक झाला. इराणी करंडक जिंकल्याने विदर्भ संघाला बक्षिस म्हणून जी काही रक्कम मिळेल, ती शहिदांच्या कुटुंबीयांना आम्ही देणार आहोत, असे फैज फजलने जाहीर केले आहे. या निर्णयाचे मैदानातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. इराणी करंडक जिंकणाऱ्या संघाला बीसीसीआयच्यावतीने १० लाखांचे बक्षिस दिले जाते.
गुरुवारी पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना बक्षिसातून मिळणारी रक्कम देण्याचा निर्णय विदर्भ टीमचा कर्णधार याने घेतला. फैज फजलच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्यावर समाजमाध्यमांवरुन तोंडभरुन कौतुक केले जात आहे. सलगपणे दोन वर्ष रणजी आणि इराणी करंडक जिंकण्याची कामगिरी विदर्भ संघाने केली आहे. अ़शी कामगिरी करणारा विदर्भ हा तिसराच संघ ठरला आहे. याआधी अशी कामगिरी मुंबई आणि कर्नाटक या संघाने केली आहे.
नक्की काय म्हणाला फैज
शहिदांना वाहिली श्रद्धांजली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विदर्भ आणि शेष भारत संघाने श्रद्धांजली अर्पित केली. तसेच या खेळाडूंनी सामन्याच्या चौथ्या दिवशी या घटनेचे निषेध म्हणून हातावर काळ्या फिती बांधल्या.