Team India : T20 चा नवा कॅप्टन कोण? इरफान पठाणचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Irfan Pathan on Team India : रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटचं (Team India T20 Captaincy) कर्णधारपद सोडणार, असा खडा लागताच टी-ट्वेंटीचा नवा कॅप्टन (Team India New Captain) कोण?, असा सवाल उपस्थित होतोय.
Irfan Pathan on Team India T20 Captaincy: टी-ट्वेंटी वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) च्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर (Team India) सध्या जोरदार टीका होत आहे. खास करून कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला एकूण 168 धावांचं आव्हान राखता आलं नाही. या पराभवामुळे टीम इंडियाची नाचक्की झाल्याचं दिसतंय. 2013 मध्ये भारताने शेवटचं आयसीसीचे (ICC Trophy) विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर भारताला खास कामगिरी करता आली नाही.
विराटनंतर (Virat Kohli) आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर देखील टीका होताना दिसत आहे. त्यामुळे आता टी-ट्वेंटीची कॅप्टन्सी रोहित सोडणार असल्याचं चित्र आहे. रोहित शर्मा टी-ट्वेंटी क्रिकेटचं (Team India T20 Captaincy) कर्णधारपद सोडणार, असा खडा लागताच टी-ट्वेंटीचा नवा कॅप्टन (Team India New Captain) कोण?, असा सवाल उपस्थित होतोय. त्यावर आता भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण (Irfan Pathan) याने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला इरफान पठाण?
टी-ट्वेंटीचा नवा कॅप्टन कोण ? या प्रश्नाच्या सुरू असलेल्या बैठकीत इरफान पठाणने उडी मारली आहे. भविष्यात रोहित शर्माची जागा घेण्यासाठी हार्दिक पांड्या (hardik Pandya) चांगला पर्याय आहे, असं इरफान पठाणने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्याला कॅप्टन करण्यात थोडी रिस्क देखील असल्याचं त्यानं म्हटलंय.
आणखी वाचा - IPL 2023 Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा 'बिग शो' राहणार की जाणार? भज्जी म्हणतो...
दरम्यान, जेव्हा तुम्ही कॅप्टन (Team India Captain) बदलता, तेव्हा निकाल देखील बदलतो. हार्दिक पांड्या (hardik Pandya) ऑलराऊंडर खेळाडू आहे. त्यामुळे अनेकदा तो जखमी झाल्याचं दिसतं. त्यामुळे आणखी एक पर्याय असला पाहिजे, असंही इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाला आहे.