Irfan Pathan On Team India : सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये अखेरचे सामने खेळले जात आहेत. जिंकलो तर सेमीफायनल अन् हरलो तर घरी, असं समीकरण (T20 World Cup Points Table) आता दोन्ही गटात दिसतंय. त्यामुळे आता एक एक सामना महत्त्वाचा ठरताना दिसतोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज आणि समालोचक इरफान पठाणने (Irfan Pathan) मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा आगामी सामना मेलबर्नच्या (Melbourne Cricket Ground) मैदानावर खेळला जाणार आहे. India आणि Zimbabwe या दोन्ही संघात 42 वा सामना खेळला जाईल. हा सामना टीम इंडियासाठी सेमीफायनलचं (T20 World Cup Semi final) तिकीट असणार आहे. त्यामुळे रोहित सेना कोणतीही चूक करण्याची शक्यता शुन्य आहे. अशातच आता इरफान पठाणने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Irfan Pathan ?


भारत विरुद्ध झिम्बॉब्वेच्या (India vs Zimbabwe) सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला तर त्याचवेळी टीम इंडियाचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. पण जर टीम इंडिया झिम्बॉब्वेला पराभूत करू शकली नाही तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या लायक नाहीत, असं मी मानतो, असं वक्तव्य इरफान पठाणने केलंय.


आणखी वाचा- ENG vs SL: उगीच टीम सेमीफायनलला गेली नाही...फिल्डिंग असावी तर अशी, लिविंग्स्टनचा नादच खुळा!


दरम्यान, पहिल्या गटात आता न्यूझीलंडने सेमीफायनलचं तिकीट (SemiFinals) निश्चित केलंय. तर दुसरीकडे इंग्लंडने देखील ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे आता पहिल्या गटातून न्यूझीलंड आणि इंग्लंड दोन्ही संघ सेमीफायनल खेळतील. तर दुसऱ्या गटात भारत आणि साऊथ अफ्रिका सेमीफानयलला जाण्याची शक्यता आहे.