मुंबई : क्रिकेट आणि बॉलीवूडचं नातं काही रसिकांना नवीन नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं लग्न केल्यानंतर आता नव्या जोडप्याची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री हा अभिनेत्री निमरत कौरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ५६ वर्षांचा रवी शास्त्री ३६ वर्षांच्या निमरत कौरला डेट करत असल्याचं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे. निमरत कौर ही अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट या चित्रपटात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री यांनी २०१२ साली पत्नी रितू सिंग यांच्याशी घटस्फोट घेतला. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांना एक मुलगीही आहे. याआधी रवी शास्त्रीचं नाव अभिनेत्री अमृता सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. १९८० साली रवी शास्त्री आणि अमृता सिंगबद्दल बोललं गेलं होतं.


मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार मागच्या २ वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. २०१५ साली एका कार लॉन्चिंगच्या कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली होती.


रवी शास्त्री हे सध्या इंग्लंडमध्ये भारतीय टीमसोबत आहेत. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला आहे. आता ७ सप्टेंबरला पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे.