नागपूर : ऑस्ट्रेलियाला ४-१ने धुळ चारत भारताने पाच सामन्यांची मालिका खिशात टाकली. या विजयात षटकारांची आतषबाजी करणाऱ्या फलंदाज हार्दिक पंड्याची भूमिका वजनदार ठरली आहे. म्हणूनच त्याला 'मॅन ऑफ द सीरीज' ठरविण्यात आले. पण, तुम्हाला माहित आहे का, पंड्या षटकारांची आतषबाजी का करतो....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच सामन्यांच्या मालिकेत पंड्याने एकूण २२२ धावा केल्या. नागपूरमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही हा भाग वेगळा. पण, आपल्या बॅटची जादू दाखवणाऱ्या पंड्याने चेंडूवर असलेली आपली हुकुमतही दाखवून दिली. या मालिकेत पंड्याने ७ बळी घेतले.


दरम्यान, आपल्या धडाकेबाज फलंदाजीचे आणि षटकांचे गुपीतही पंड्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले. पंड्या म्हणाला, मैदानावर मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा मी फायदा घेत गेलो. त्यामुळे एक निश्चित धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य गाठत आम्ही मालिका जिंकू शकलो. खेळादरम्यान माझे संपूर्ण लक्ष हे तंदुरूस्ती आणि कठोर मेहनतीवर होते. मला ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळायला मजा येते, असे पंड्याने सांगितले. दरम्यान, मॅन ऑफ द सीरीज मिळाल्या आपल्याला प्रचंड आनंद झाल्याचेही पंड्याने म्हटले आहे.


षटकार ठोकण्याचा शौक


सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि जहीर खान यांच्यासोबत केलेल्या खास संवादात पंड्याने सांगितले की, मला सुरूवातीपासूनच षटकार ठोकायला आवडते. अगदी सुरूवातीला मी षटकार ठोकायला जात असे तेव्हा, लॉंग ऑनवर आऊट होत असे. पण, नंतर मी काहीशा वजनदार बॅटने खेळायला सुरू केले. त्याचा परिणाम असा झाला की, चेंडू जरी योग्य उंचीवर आणि वेगात आला नाही. पण, आपण त्याला चांगल्या पद्धतीने टोलवला तरीसुद्धा तो सहज मैदानाच्या सीमेपार जातो.


डझनभर षटकारांचा मालिकेत पाऊस


पंड्याने या मालिकेत तब्बल १२ षटकार ठोकले. या षटकारांच्या मदतीने त्याने २२२ धावा केल्या. त्याची उच्चांकी धावसंख्या ८३ इतकी राहिली आहे. हा उच्चांक त्याने चेन्नईत गाठला आहे. ३३ हा पंड्याचा आतापर्यंतचा सर्वात उच्च धावांक राहिला आहे. या मालिकेत त्याने ७ बळीही घेतले.