IND vs BAN 3rd ODI: भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चितगाव येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने सुरुवातीचे 2 सामने जिंकले असून त्यांनी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघ अद्याप विजयच्या प्रतीक्षेत आहे. याचदरम्यान बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (India vs Bangladesh) भारताचा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) अवघ्या 131 चेंडूत 210 धावांची खेळी करत इतिहास रचला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ईशान किशन हा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज आहे. ईशान किशनसमोर (Ishan Kishan)  आज बांगलादेशचा प्रत्येक गोलंदाज नमला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चितगावच्या मैदानावर इशान किशनची (Ishan Kishan) अशी तुफान खेळी झाली. ज्यामध्ये बांगलादेशी गोलंदाजांची तारांबळ उडवली. वेस्ट इंडीजचा (West Indies) विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या (Chris Gayle) नावावर होता. त्यानं 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 138 चेंडूत 200 धावांचा शिखर गाठला होता. मात्र, बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशननं विक्रमी द्विशतक ठोकून जगासमोर आपली गुणवत्ता सिद्ध केली. इशान किशनने 131 चेंडूत 24 चौकार आणि 10 षटकारांसह 210 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दरम्यान, इशान किशनचा स्ट्राइक रेट 160.31 राहिला आहे. ईशान किशनच्या आधी रोहित शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतके झळकावली आहेत.


 वाचा टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य; कोहलीने शतक तर किशन द्विशतक  


विश्वविक्रम मोडून इतिहास रचला


इशान किशनने 126 चेंडूत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा विश्वविक्रम मोडला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 138 चेंडूत द्विशतक झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. मात्र आता ईशान किशनने त्याचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला आहे. 


एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या फलंदाजांची संपूर्ण यादी


रोहित शर्मा -264


मार्टिन गुप्टिल - 237*


वीरेंद्र सेहवाग - 219


ख्रिस गेल - 215


फखर जमान - 210*


इशान किशन - 210


रोहित शर्मा - 209


रोहित शर्मा - 208*


सचिन तेंडुलकर - 200*