इशान किशनमुळे हुकली मोहम्मद शमीची हॅटट्रिक?
शमीच्या तीन चेंडूंवर 3 विकेट पडल्या पण त्याला आपली हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही.
मुंबई : T20 वर्ल्डकपमधील चौथ्या सामन्यात भारताने स्कॉटलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता पुन्हा सेमीफायनल गाठण्याच्या भारताच्या आशा जिवंत आहेत. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. संघाने उत्तम अशी गोलंदाजी करत 17व्या ओव्हर्सच्या शमीच्या तीन चेंडूंवर 3 विकेट पडल्या पण त्याला आपली हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही.
शमीची 17वी ओव्हर
भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने भारतीय डावातील 17वी ओव्हर टाकली. या ओवहरमध्ये शमीने स्कॉटलंड संघाच्या फलंदाजीचा कणा मोडला. 17व्या ओव्हरमध्ये पहिल्या तीन चेंडूंवर स्कॉटलंडच्या तीन विकेट पडल्या. कॅलम मॅक्लिओड पहिल्याच चेंडूवर 16 धावा काढून बाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर सफयान शरीफ (0) इशान किशनने धावबाद केला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर इव्हान्सही खातं न उघडता शमीच्या चेंडूवर बाद झाला.
या ओव्हरमध्ये शमीला 2 विकेट्स मिळाले. शमीच्या दुसऱ्या चेंडूवर इशान किशनने सफियानला रनआऊट केलं नसतं तर शमीची हॅट्ट्रिक होऊ शकली असती. मात्र एक खेळाडू रन आऊट झाल्यामुळे शमीची हॅट्ट्रिक होऊ शकली नाही.
सेमीफायनलच्या पुन्हा आशा जागल्या
अफगाणिस्तानाच्या मानाने चांगलं रनरेट उभारण्यासाठी भारताला स्कॉटलंडने दिलेलं लक्ष्य 7.1 ओव्हर्समध्ये गाठायचं होतं. मात्र भारताने हे लक्ष्य 6.3 ओव्हर्समध्येचं पार केलं. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 6.3 ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून 89 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने 19 चेंडूत 50 रन्स केले आणि रोहित शर्माने 16 चेंडूत 30 रन्स केलं.
हा संघ भारताला उपांत्य फेरीत देणार प्रवेश
भारताचं रनरेट आता अफगाणिस्तानपेक्षाही चांगला झालंय. स्कॉटलंडवरील विजयामुळे भारताचा धावगती +1.619 वर गेलंय. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचं रन रेट देखील +1.065 आहे. रविवारी न्यूझीलंडशी सामना करणाऱ्या अफगाणिस्तानवर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताला नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागला आहे. मात्र, न्यूझीलंडचा विजय भारताला स्पर्धेतून बाहेर काढेल.