मुंबई : आयपीएल सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी एक चांगली बातमी आहे. या मोसमात मुंबईकडून खेळणाऱ्या ईशान किशननं एका टी-20 मॅचमध्ये शानदार शतक झळकवलं. ईशान किशननं ४९ बॉल्समध्ये १२४ रन्सची खेळी केली. ४२ बॉल्समध्येच ईशाननं त्याचं शतक पूर्ण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये एका लीग मॅचदरम्यान रोड सेफ्टी इलेव्हन या टीमकडून खेळताना ईशाननं ही वादळी खेळी केली. ईशानच्या या खेळीमुळे त्याच्या टीमनं १४ ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता २०४ रन्स केल्या.


दिग्गज खेळाडू होते मैदानात


बिहारचा असलेल्या ईशान किशनला आयपीएलच्या लिलावामध्ये मुंबईनं ६.२ कोटी रुपयांना विकत घेतलं. या मॅचमध्ये शिखर धवन, के.एल.राहुल, सुरेश रैना, जसप्रीत बुमराह यासारख्या दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ट्रॅफिकच्या समस्या, रस्ते सुरक्षा, ध्वनी प्रदूषण यासारख्या समस्यांवर जनजागृती व्हावी म्हणून टाटा हॉर्न ओके प्लीज ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं.


सुरेश रैना-युवराज होते कॅप्टन


ईशान किशन खेळत असलेल्या टीमचा कॅप्टन सुरेश रैना होता. तर युवराज सिंग हॉकिंग इलेव्हनचा कॅप्टन होता. पहिले बॅटिंग करताना हॉकिंग इलेव्हनच्या विकेट लवकर पडल्या. पण के.एल.राहुलनं ३१ बॉल्समध्ये ५६ आणि ऋषभ पंतनं २० रन्सची खेळी केल्यामुळे हॉकिंग इलेव्हननं २० ओव्हरमध्ये २०२ रन्स केल्या.


धोनीनं दिल्या ईशान किशनला टीप्स


मुळचा बिहारचा असलेला ईशान किशन महेंद्रसिंग धोनीसारखा विकेट कीपर बॅट्समन आहे. वाईट फॉर्ममधून जाणाऱ्या ईशान किशनला धोनीनं बोलवून बॅटिंगच्या टीप्स दिल्या होत्या. धोनीच्या सल्ल्यानंतर ईशान किशनच्या बॅटिंगमध्ये अनेक बदल झाले. ईशान किशन आणि महेंद्रसिंग धोनी दोघंही झारखंडकडून खेळतात.